महत्त्वाची बातमी : आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रची तात्काळ कर्ज योजना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तातडीच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे दोन वर्षे नियमित पिक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत तात्काळ कृषी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे, असे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी कळविले आहे.

या योजनेद्वारे शेतकऱ्यांना पीक कर्ज, बियाणे, खत, औषधे तसेच शेतीसंबंधित इतर आवश्यक खर्चासाठी त्वरित कर्ज मिळणार आहे. पूरग्रस्त आणि आपत्तीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा विशेष लाभ मिळेल. पूर किंवा नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या अर्जांना प्राधान्य दिले जाईल. दोन्ही जिल्ह्यांतील बँकेच्या सर्व ग्रामीण व अर्ध-शहरी शाखांमधून अर्ज करण्याची सुविधा आहे. सर्व शाखांना तात्काळ कर्ज मंजुरीचे अधिकार दिले आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत भेट द्या, असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!

Latest News

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ! वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा...
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
कांचनवाडीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या युवकावर पोलिसांनी घातली झडप!, व्हॉट्‌स ॲप चॅटिंगमध्ये झाला धक्कादायक उलगडा...
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software