छत्रपती संभाजीनगरहून पैठण किंवा धुळे-चाळीसगावला जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी... वाहतुकीत मोठे बदल...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ते पैठण मार्गावरील बिडकीत हद्दीत चितेगाव येथे रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ११ डिसेंबर २०२५ पर्यंत या मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. सर्व वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आदेश पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. विनयकुमार राठोड यांनी जारी केले आहेत.

-छत्रपती संभाजीनगर ते पैठणकडे जाणारी जड वाहतूक आता छत्रपती संभाजीनगर- वाळूज, ईमामपूरवाडी- रांजणगाव- शेकटामार्गे बिडकीन व पुढे पैठणकडे जाईल.
-पैठण ते छत्रपती संभाजीनगरकडे येणारी जड वाहतूक आता पैठण- बिडकीन- शेकटा- रांजणगाव- ईमामपूरवाडी- वाळूजमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येईल.
-छत्रपती संभाजीनगर ते पैठणकडे जाणारी जड वाहतूक आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२- कचनेर कमान- कचनेर- पोरगाव चौफुली- निलजगाव- बिडकीनमार्गे पैठणकडे जाईल.
-पैठण ते छत्रपती संभाजीनगरकडे येणारी जड वाहतूक आता पैठण- बिडकीन- निलजगाव- पोरगाव चौफुली – कचनेर- कचनेर कमान- राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ५२ मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येईल.
-छत्रपती संभाजीनगर ते पैठणकडे जाणारी हलकी वाहतूक छत्रपती संभाजीनगर- गेवराई तांडा- गिरनेर तांडा- बोकूडजळगाव- निलजगावमार्गे बिडकीन व पुढे पैठणकडे जाईल.
-पैठण ते छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी हलकी वाहतूक पैठण- बिडकीन- निलजगाव- बोकुडजळगाव- गिरनेर तांडा- गेवराई तांडामार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येईल.

छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव-धुळे मार्गाचे काय?
छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव- धुळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर नांदगाव तलवाडा घाट शिऊर बंगला या भागात रस्त्याचे काम सुरू असल्याने २५ नोव्हेंबर २०२५ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत सर्व प्रकारची अवजड- जड वाहतुकीसाठी पर्यायी वाहतूक मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आदेशही पोलीस अधीक्षक डॉ. राठोड काढले आहेत.
-छत्रपती संभाजीनगरकडून कन्नड व तलवाडा घाटातून चाळीसगावकडे जाणारी वाहतूक आता छत्रपती संभाजीनगर- साजापूर- लासूर- गंगापूर चौफुली- वैजापूर- येवला- मनमाड- चाळीसगाव धुळेकडे जाईल.
-छत्रपती संभाजीनगरकडून कन्नड व तलवाडा घाटातून धुळ्याकडे जाणारी वाहतूक आता छत्रपती संभाजीनगर- साजापूर-(सोलापूर- धुळे मार्गाने) माळीवाडा समृद्धी महामार्गाने झांबरगावपर्यंत तेथून खाली उतरून गंगापूर चौफुली वैजापूर- वैजापूर येवला- मनमाडमार्गे धुळेकडे जाईल.
-छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव –धुळेकडे जाणारी जड वाहतूक  आता छत्रपती संभाजीनगर साजापूर- कसाबखेड फाटा- देवगाव रंगारी- शिऊर- वैजापूर मार्गे येवला- मनमाड- चाळीसगावमार्गे धुळेकडे जाईल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software