पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठण येथे वीटभट्टीवर मजुरी करणारी युवती ८ मार्चपासून बेपत्ता झाली असून, तिच्या वडिलांनी पोलिसांत दिली आहे. राधा राजू बर्डे (वय १९) असे या युवतीचे नाव असून पैठण येथे राहणारी आहे. उंची ५ फूट, रंग सावळा, बांधा सडपातळ, अंगात काळ्या रंगाचा टॉप व लेगिंग, शिक्षण ५ वी, मराठी बोलता येते. या वर्णनाची युवती आढळल्यास पैठण पोलीस स्टेशनचे निरीक्षक एम.बी. गोमारे मोबाईल क्रमांक ९०४९९८०७५५ व तपास अंमलदार पोहेकाँ श्री. गायकवाड मोबाईल नंबर ८८८८८३९०५० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पैठण पोलिसांनी केले आहे.

विवाहिता बेपत्ता
पैठण शहरातील लक्ष्मीनगर येथील रहिवासी असलेली शितल विजय चव्हाण (वय २५ वर्षे) ही विवाहीत महिला १३ मार्च रोजी राहत्या घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेली आहे, अशी खबर तिचा पती धनंजय विजय कसाब यांनी पैठण पोलिसांत दिली आहे. शितल विजय चव्हाण, वय २५ वर्षे, व्यवसाय घरकाम, उंची ५ फूट ३ इंच, रंग गोरा, बांधा सडपातळ, अंगात गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात हिरव्या रंगाची चप्पल, मराठी, हिंदी, बंजारा भाषा बोलते. या वर्णनाची महिला आढळल्यास पैठण पोलीस स्टेशनचे निरीक्षक एम.बी. गोमारे मोबाईल क्रमांक ९०४९९८०७५५ व तपास अंमलदार पोहेकाँ श्री. गायकवाड मोबाईल नंबर ८८८८८३९०५० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पैठण पोलिसांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश

Latest News

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आवश्यक आहे. त्यात सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा...
पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन
घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक...
आधी कोण?; अध्यक्षपदासाठी भाजप, शिंदे गटात रंगली वर्चस्वाची लढाई, ठाकरे गटाच्या आशा पल्लवीत... उद्या काय होणार?
खडकेश्वरमधील ती काळरात्र... २ भंगारवेचकांच्या अंगावरून चारचाकी गेली... एकाचा मृत्यू, दुसरा जखमी; जगण्यासाठीची धडपड थांबली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software