अतिवृष्टीचे अनुदान देण्यात आता ‘ॲग्रीस्टॅक’ची आडकाठी!; छत्रपती संभाजीनगर १ लाख ३१ हजार शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी प्रलंबित, आज-उद्या प्रत्येक गावात विशेष कॅम्प लावून नोंदणी करणार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : फार्मर आयडी अर्थात ॲग्रीस्टॅक नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मदत अनुदान त्यांच्या खात्यात जमा होण्यास अडचण निर्माण होत आहे. जिल्ह्यात १ लाख ३१ हजार ७६५ शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी अद्याप प्रलंबित आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्यासाठी ८ व ९ नोव्हेंबरला प्रत्येक गावात विशेष कॅम्पचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी माहिती दिली, की जिल्ह्यात १३५५ गावांमध्ये ६ लाख ३१ हजार ७८ शेतकरी आहेत. त्यापैकी ४ लाख ९९ हजार ३१३ शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केली आहे. अद्याप १ लाख ३१ गहार ७६५ शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही, तर ४८ हजार ३५५ ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदणीस मान्यता नाही. -

शून्य ते २ हेक्टरपर्यंतच्या ६ लाख ४४ हजार ६४९ शेतकऱ्यांना ४८० कोटी १७ लाख ३ हजार रुपये इतके अनुदान मंजूर आहे. त्यापैकी ४ लाख ६३ हजार १४९ शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी अपलोड करण्यात आली असून त्यांची एकूण रक्कम ३४७ कोटी २० लक्ष ३४ हजार रुपये इतकी आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत २ लाख ८७ हजार ७५१ शेतकऱ्यांना २१५ कोटी ६५ लख ७३ हजार रुपये इतके अनुदान वाटप झाले आहे.

-२ ते ३ हेक्टर क्षेत्र बाधीत असलेल्या ४१ हजार १३९ शेतकऱ्यांपैकी १२ हजार ७६७ शेतकऱ्यांचे अनुदान ६ कोटी ४५ लाख १२ हजार रुपये इतके अपलोड झाले आहे, तर प्रत्यक्षात ८ हजार ३०७ शेतकऱ्यांना ४ कोटी ३३ लक्ष ३ हजार रुपये इतके अनुदान प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यात अद्याप १ लाख ३१ हजार ७६५ शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी नाही. त्यामुळे त्यांचे अनुदानाबाबत प्रक्रिया होत नाही. अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांचे अनुदान वितरीत करण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी  असणे आवश्यक आहे. उर्वरित शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्यासाठी प्रत्येक गावात ८ व ९ नोव्हेंबरला सर्व गावांत विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्ह्यात सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना शुक्रवारी (७ नोव्हेंबर) निर्देश देण्यात आले आहेत. त्या त्या गावात आपले सरकार सेवा केंद्रही सुरु ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बीड बायपासवरील लॉजवर पकडल्या २ बांगलादेशी महिला

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software