‘एसटी’आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक; कन्‍नडमध्ये भव्य मोर्चा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्‍नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्‍नडमध्ये बंजारा समाजबांधवांनी शुक्रवारी (१९ सप्‍टेंबर) भव्य एल्गार मोर्चा काढला. हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली. मोर्चा दुपारी साडेबाराला शहरातील गिरणी ग्राउंडपासून निघाला, पिशोर नाकामार्गे तहसील कार्यालयावर धडकला.

पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज, सुनील महाराज व बंजारा समाज आरक्षण अभ्यासक वीरा राठोड, आकांक्षा चव्हाण आणि मुलींच्या हस्ते तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात माजी आमदार उदयसिंग राजपूत यांच्यासह बंजारा समाजातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. तहसील कार्यालयासमोर उभारलेल्या मान्यवरांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले.  

बंजारा समाज आदिवासी असून, त्यांना अनेक राज्यांत एसटी प्रवर्गातून आरक्षण आहे. महाराष्ट्रातील काही तांड्यांनाही आधीच हा लाभ मिळाला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण लागू करावे. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्यासाठी नव्हे, तर चार पिढ्यांपासून प्रलंबित हक्कासाठी मोर्चा काढल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. अत्यंत शिस्तीत मोर्चा निघाला. मोर्चेकऱ्यांसाठी मराठा व मुस्लीम बांधवांनी चहा, नाश्ता, फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software