१४ वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्‍महत्‍येने अवघे गाव शॉक्ड, सिल्लोड तालुक्यातील घटना, टोकाचे पाऊल उचलण्यामागे कारण काय...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जळकी वसई (ता. सिल्लोड) येथे नववीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याने अवघे गाव शॉक्ड झाले आहे. ही घटना शुक्रवारी (२० फेब्रुवारी) मध्यरात्री घडली. शनिवारी (२१ फेब्रुवारी) सकाळी आठला फासावर लटकलेला मृतदेह पाहून आई-वडिलांनी हंबरडा फोडला.

ज्‍योती दीपकलाल जैस्वाल (वय १४, रा. जळकी वसई) असे आत्‍महत्‍या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ज्‍योती गावातीलच शाळेत शिकत होती. तिने राहत्‍या घरात दोरीने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्‍यात देण्यात आला. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. अजिंठा पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद करून आत्‍महत्‍येचे कारण शोधायला सुरुवात केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुसाट क्रेटा कारने मेंढ्यांचा कळप उडवला, ६ मेंढ्यांचा मृत्‍यू, वाळूज MIDC परिसरातील घटना

Latest News

सुसाट क्रेटा कारने मेंढ्यांचा कळप उडवला, ६ मेंढ्यांचा मृत्‍यू, वाळूज MIDC परिसरातील घटना सुसाट क्रेटा कारने मेंढ्यांचा कळप उडवला, ६ मेंढ्यांचा मृत्‍यू, वाळूज MIDC परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रस्त्याने मेंढ्या घेऊन जात असताना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत सहा मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही...
१५ वर्षांच्या मुलीचा २६ वर्षीय तरुणासोबत लागणार होता बालविवाह!; हळदीच्या कार्यक्रमात धडकले दामिनी पथक..., वाळूज MIDC तील वडगाव कोल्हाटीची घटना
बैल कत्तलीसाठी नेले जात असल्याचा संशय, वाळूज MIDC मध्ये ट्रक अडवून चालकासह चौघांना बेदम मारहाण
नापिकी, कर्जबाजारीपणामुळे माजी ग्रा. पं. सदस्याची आत्‍महत्‍या, पैठण तालुक्‍यातील दुर्दैवी घटना
डोक्यात दगड घालून महिलेचा निर्घृण खून, कुणाशी वैर नसताना कुणाच्या अंगात शिरला कूरकर्मा, अवघे गाव शॉक्ड... छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software