मुकुंदवाडीत अनधिकृत होर्डिंग्जने घेतला महापालिका कर्मचाऱ्याचा बळी!, महापालिका आयुक्‍तांनी घेतली कठोर भूमिका, यापुढे...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शिवजयंतीचे अनधिकृत होर्डिंग्ज काढताना वरून जाणाऱ्या विजेच्या हायटेन्शन तारेला स्पर्श होऊन महापालिकेचे सफाई कामगार अमोल दिनकर जाधव (वय ३०, रा. गल्ली नं. ५, संजयनगर, मुकुंदवाडी) यांचा मृत्‍यू झाला. ही घटना शनिवारी (२१ फेब्रुवारी) सकाळी ९ च्या सुमारास मुकुंदवाडीतील हनुमान मंदिराजवळ घडली. शहरातील बॅनरबाजीने घेतलेल्या बळीमुळे संतप्त भावना व्यक्त होत असून, आता तरी प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनरबाजीविरोधात कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.

अमोल यांचे सहकारी रवि रणधीर रिडलॉन (वय ३८, रा. गांधीनगर) हेही या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात अमोल जाधव यांचे मेहुणे महेंद्र लोखंडे यांच्या तक्रारीवरून महापालिका सुपरवायझर शिवश्याम काळे, संबंधित महापालिका अधिकारी व होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरुद्ध मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेचे सहायक आयुक्‍त प्रसाद देशपांडे यांनीही तक्रार दिली असून, त्यावरून होर्डिंग्जवर फोटो असलेले दीपक खोतकर, प्रल्हाद गायकवाड, प्रशांत ठोंबरे, श्रीमंत गायकवाड, रघुनाथ पिवळ, स्वप्निल उर्फ मोनू, बॅनर प्रिंट करून देणारा दुकानदार व अन्य पाच ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महापालिका आयुक्‍त जी. श्रीकांत यांनी या घटनेबाबत सांगितले, की अमोल जाधव यांच्या कुटुंबाला १ कोटी १५ लाख रुपयांची मदत महापालिका करणार आहे. त्‍यांच्या पत्‍नीला महापालिकेत नोकरीला घेऊ. यापुढे होर्डिंग्ज लावणाऱ्याविरुद्ध थेट सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करू, असा इशाराही त्‍यांनी दिला.

घटनेबाबत सूत्रांनी सांगितले, की अमोल, रवि व त्‍यांचे सहकारी पहाटे साडेपाचला ड्युटीवर आले. साफसफाईची कामे केली. सकाळी ९ ला त्‍यांना वरिष्ठ अधिकाऱ्याचा कॉल आला. त्‍यांनी होर्डिंग्ज काढायला सांगितले. अमोल व त्‍यांचे सहकारी मुकुंदवाडीतील हनुमान मंदिरावरील शिवजयंती शुभेच्छाचे अनधिकृत होर्डिंग्ज काढत असताना विजेच्या हायटेंशन तारांना होर्डिंग्जच्या लोखंडी फ्रेमचा स्पर्श झाला. अँगलमधून वीजप्रवाह उतरून अमोल, रवि यांना जबरदस्त शॉक बसला. चिकलठाण्याच्या मिनी घाटीत उपचारादरम्‍यान अमोल यांचा मृत्‍यू झाला तर रवि यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अमोल यांचे वडील खासगी नोकरी करतात. आई महापालिकेतच सफाई कामगार होती. त्‍यांनी अडीच वर्षांपूर्वी स्‍वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्‍यांच्या जागेवर अमोल हे नोकरीला लागले होते. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुसाट क्रेटा कारने मेंढ्यांचा कळप उडवला, ६ मेंढ्यांचा मृत्‍यू, वाळूज MIDC परिसरातील घटना

Latest News

सुसाट क्रेटा कारने मेंढ्यांचा कळप उडवला, ६ मेंढ्यांचा मृत्‍यू, वाळूज MIDC परिसरातील घटना सुसाट क्रेटा कारने मेंढ्यांचा कळप उडवला, ६ मेंढ्यांचा मृत्‍यू, वाळूज MIDC परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रस्त्याने मेंढ्या घेऊन जात असताना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत सहा मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही...
१५ वर्षांच्या मुलीचा २६ वर्षीय तरुणासोबत लागणार होता बालविवाह!; हळदीच्या कार्यक्रमात धडकले दामिनी पथक..., वाळूज MIDC तील वडगाव कोल्हाटीची घटना
बैल कत्तलीसाठी नेले जात असल्याचा संशय, वाळूज MIDC मध्ये ट्रक अडवून चालकासह चौघांना बेदम मारहाण
नापिकी, कर्जबाजारीपणामुळे माजी ग्रा. पं. सदस्याची आत्‍महत्‍या, पैठण तालुक्‍यातील दुर्दैवी घटना
डोक्यात दगड घालून महिलेचा निर्घृण खून, कुणाशी वैर नसताना कुणाच्या अंगात शिरला कूरकर्मा, अवघे गाव शॉक्ड... छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software