आदित्य, तिअरा, राशी, नामधारी सीड्स कंपनीचे बियाणे बोगस निघाले; वरून खोटे दावे, सिल्लोडच्या शेतकऱ्याने शिकवला धडा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : खात्रीशीर बियाणे, चांगले पीक येण्याची खात्री, रोग पडणार नसल्याचा दावा अशा बियाणे कंपन्यांच्या जाहिरातीला भुलून एका शेतकऱ्याने कपाशीची लागवड केली खरी; पण कंपन्यांचा एकही दावा खरा ठरला नाही. अखेर शेतकऱ्याने त्या कंपन्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आणि त्या कंपन्यांना धडा शिकवला. खंडपीठाने चारही बियाणे कंपन्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावून ही रक्कम शेतकऱ्याला अदा करण्याचे आदेश दिले आहेत.

कायगाव (ता. सिल्लोड) येथील याकूब अय्युब शेख या शेतकऱ्याने २०१८ साली आपल्या नऊ एकर शेतात कपाशीची लागवड केली होती. यासाठी शेख यांनी आदित्य, तिअरा, राशी आणि नामधारी सीड्स या कंपन्यांकडून बियाणे विकत घेतले होते. शेख यांनी ७५० रुपयांची ४७५ ग्रॅमच्या बियाण्यांची नऊ पाकिटे खरेदी केली होती. संबंधित बियाणांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक असल्याचे आणि त्यामुळे कपाशीवर रोग पडणार नाही, असे बियाणे कंपन्यांच्या पाकिटावर नमूद केलेले होते. हा दावा खरा मानून शेख यांनी त्या पाकिटांची खरेदी केली आणि बियाणे शेतात लावले. मात्र, काही दिवसांतच पिकावर रोग पडला. त्यामुळे कपाशी उगवलीच नाही.

बियाणे बोगस निघाल्यामुळे शेख यांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे संतापलेल्या शेख यांनी राज्याच्या कृषी आयुक्तांकडे या संदर्भात दावा दाखल केला. कृषी आयुक्तांनी शेख यांच्या याचिकेवर सुनावणी घेत संबंधित चारही कंपन्यांनी शेख यांना प्रत्येकी २० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश दिला होता. मात्र, ही भरपाई तुटपुंजी असल्याने शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून या आदेशाला आव्हान दिले होते. खंडपीठात ॲड. किशोर खाडे यांनी याचिकाकर्ते शेख यांची बाजू मांडली. या याचिकेच्या अंतिम सुनावणीवेळी न्या. आर. एम. जोशी यांनी शेख यांचा दावा मान्य करत चारही कंपन्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. न्यायालयाच्या आदेशानुसार आता चारही कंपन्यांनी ही रक्कम याचिकाकर्ते शेख यांना द्यावयाची आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!

Latest News

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ! वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा...
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
कांचनवाडीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या युवकावर पोलिसांनी घातली झडप!, व्हॉट्‌स ॲप चॅटिंगमध्ये झाला धक्कादायक उलगडा...
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software