वैजापूर, सिल्लोडमध्ये २ वृद्धांचा अपघाती मृत्यू, ट्रक, दुचाकी बनली काळ!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर/सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सहारा हॉटेलजवळ बुधवारी (१७ डिसेंबर) दुपारी २ च्या सुमारास ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. यात दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाला. मन्साराम दशरथ आव्हाळे (वय ७०, रा. आघूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

आव्हाळे हे दुचाकीने (क्र. एमएच ५७-ए ४७५२) वैजापूर शहरातून गंगापूर रस्त्याकडे जात होते. ट्रकने (एमएच ०४-६०५५) मागून धडक देताच त्यांचा जागीच मृत्यू झाला. आव्हाळे हे महावितरण कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. दुसऱ्या अपघातात सिल्लोडमध्ये पायी जाणाऱ्या पाटीलबा तुळशीराम जंजाळ (वय ७५, रा. सावरखेडा) यांना दुचाकीस्वाराने धडक दिली. जखमी होऊन जंजाळ यांचा सिल्लोड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात बुलडाणा अर्बन वेअर हाउससमोर बुधवारी (१७ डिसेंबर) दुपारी १ च्या सुमारास घडला. पाटीलबा हे सिल्लोड ते भोकरदन रस्त्यावर पिंपरी गावाजवळ रस्त्याने पायी जात होते. दुचाकीने (एमएच २० एचएल ४५१५) त्यांना उडवले. अपघातानंतर तासाभरातच त्यांचा मृत्यू झाला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software