चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर‎ (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चिकलठाणा भागातील हिनानगरमध्ये आज, ३ मार्चला दुपारी पाऊणच्या सुमारास मंडप डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग इतकी मोठी होती, की दूरदूरून आगीचे लोळ दिसून येत होते. अग्निशमन दल येईपर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले, त्यानंतर दलाने येऊन २ तासांत आग पूर्णपणे विझविली. आगीत वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली असून, जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. हे गोदाम कुणाचे आहे, हे वृत्त लिहीपर्यंत कळू शकले नाही.

गोदामात मंडपाचे कापड, बांबू, लाकूड आणि प्लास्टिकचे साहित्य मोठ्या प्रमाणावर ठेवलेले होते. त्यामुळे आग लागताच काही मिनिटांत रौद्ररुप धारण करत उंचच उंच लोळ उठले. पूर्ण गोदाम आगीच्या विळख्यात सापडले. गोदाम रहिवाशी भागात असल्याने आग इतरत्र पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे घबराट पसरली. नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण आगीची तीव्रता पाहून त्यांचे प्रयत्न अपुरे पडत होते. अग्निशमन दलाला कळवताच त्यांनी तातडीने बंबांसह घटनास्थळी येऊन दोन तासांत पूर्णपणे आग विझवली. धुरामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात आली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software