वेरूळ येथे तलावात बुडून १९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्‍यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वेरूळ (ता. खुलताबाद) येथे शनिवारी (३ जानेवारी) दुपारी तलावात बुडून तरुण विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आदर्श संतोष पांडे (वय १९, मूळ रा. गया, बिहार, ह. मु. महर्षी वेद विज्ञान विद्यापीठ, वेरूळ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

आदर्श आश्रमात राहूनच शिक्षण घेत होता. रविवारी सुट्टी असल्याने तो त्याच्या १६ वर्षीय लहान भावाला घेऊन कपडे धुण्यासाठी तलावावर गेला होता. कपडे धूत असताना त्याचा तोल गेला आणि तलावात बुडाला. नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक अधिकारी विनायक कदम यांच्या नेतृत्वाखाली वसीम पठाण, रावसाहेब जाधव, रावसाहेब वाकले, विशाल गरडे, रितेश कसुरे, अतुल बनकर यांनी शोधमोहीम राबवून मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्याला वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदन न करता मृतदेह मूळ गावी पाठवण्याची विनंती पालकांनी केल्याने मृतदेह लहान भाऊ आणि सहकाऱ्यांसोबत बिहारला पाठवण्यात आला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software