रात्री पती जवळ आला, की भयंकर घाबरायची, कारण त्याच्या अंगात शिरायचा सैतान!; अश्लील व्हिडीओ दाखवून अनंत यातना द्यायचा..., वैजापूरच्या तरुणीने पोलीस तक्रारीत सर्व सांगितलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : एकांतवास हा पती-पत्‍नीसाठी आनंदाचे क्षण असतात. पण २२ वर्षीय कल्याणीसाठी (नाव बदलले आहे) हा एकांतवास अनंत यातनांचा प्रवास ठरत होता. पती जवळ आला, की तिच्या अंगाला कापरे भरायचे. तो तिला अश्लील व्हिडीओ दाखवायचा आणि तसंच करायचं म्हणून आक्रमक व्हायचा. तिने विरोध केला, की बेदम मारहाण करायचा. यादरम्यान तिला भयंकर त्रासाला सामोरे जावे लागत होते... वैजापूर पोलीस ठाण्यात १६ ऑक्‍टोबरला कल्याणीने तक्रार दिली. त्यातून पतीची हैवानीयत समोर येते...

कल्याणी (नाव बदलले आहे) सध्या वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात माहेरी राहते. तिचे लग्न १६ ऑगस्ट २०२४ रोजी गवंडगाव (ता. येवला जि. नाशिक) येथील तरुणासोबत झाले होते. लग्नानंतर ती सासरी गवंडगावला नांदण्यास गेली. सासरच्या लोकांनी सुरुवातीचे दोन महिने चांगले नांदविले. नंतर त्यांच्या वागणुकीत बदल होऊन त्यांनी माहेराहून सात ते आठ लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यासाठी मारहाण व शिवीगाळ करू लागले. पतीला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी नशेत त्याच्या मोबाइलवर अश्लील व्हिडीओ लावून ते तिला दाखवत मला तसे करू दे, नसता मी संबंध ठेवणार नाही, असे म्हणून तिला चापटबुक्क्यांनी रात्री मारहाण करायचा.

तिच्यासोबत जबरदस्तीने अति त्रास होईपर्यंत शरीर संबंध करायचा. यामुळे भयंकर त्राय व्हायचा, असे कल्याणीने तक्रारीत म्हटले आहे.  ही बाब तिने सासू, सासरे व नणंदेला सांगितला असता मला ते म्हणाले, की आमचा मुलगा जसे म्हणेल तसे तू करायचे. नसता आम्हाला तुझी काही गरज नाही. आम्ही तुला सोडून देऊन आमच्या मुलाचे दुसरे लग्न करून टाकू. आमचे कोणी काही करू शकत नाही. त्यानंतर पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला घाण घाण भाषेत शिवीगाळ करून मारहाण करू लागला. तू आमच्या घरातून निघून जा. आम्हाला तुझी गरज नाही, अशी धमकी देऊन सासरचे लोक घरात तिला मोलकरणीसारखी वागणूक देऊ लागले.

माहेराहून पैसे आणत नाही तर जीवंत मारून टाकू, अशी धमकी देऊ लागले. दोन्ही नणंदाही लग्न झालेल्या असूनही वारंवार घरी येऊन तिला मानसिक त्रास द्यायच्या. अखेर त्रास असह्य होऊन कल्याणीने वैजापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तिचा पती, सासरा, सासू, भाया, जाऊ (सर्व रा. गवंडगाव) व दोन्ही नणंदा (रा. ओझर आणि कानेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार किरण गवळी करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

२२ वर्षीय तरुणीला प्रेमासाठी जबरदस्ती, लग्न मोडण्याची धमकी!, फुलंब्री तालुक्यातील घटना

Latest News

२२ वर्षीय तरुणीला प्रेमासाठी जबरदस्ती, लग्न मोडण्याची धमकी!, फुलंब्री तालुक्यातील घटना २२ वर्षीय तरुणीला प्रेमासाठी जबरदस्ती, लग्न मोडण्याची धमकी!, फुलंब्री तालुक्यातील घटना
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सताळा पिंपरी (ता. फुलंब्री) येथील एका २२ वर्षीय तरुणीला वारंवार कॉल करून प्रेमासाठी जबरदस्ती करणाऱ्या...
प्रा. राजाराम लोंढे हत्या प्रकरण : अंगठ्या, मोबाइल जप्त करण्यात यश येईना, करण आडेच्या पोलीस कोठडीत २२ मार्चपर्यंत वाढ
शहर पाणी योजनेत दखलपात्र प्रगती : धरणातून जॅकवेलमध्ये पाणी आणण्यात यश, जी. श्रीकांत यांनी पिले दोन घोट, मानले गोदामाईचे आभार!
अंबादास दानवेंवर सौदेबाजीचा आरोप, जि. प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत सदस्यांचा केला १८ कोटींना सौदा, ४ कोटी स्वतः हडपले... ‘या’ सदस्याच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ
औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software