सिल्लोडमध्ये मोकाट कुत्र्यांनी तोडले ५ जणांचे लचके!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिल्लोड तालुक्‍यात मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. सिल्लोड शहरासह बाळापूर आणि आसडीमध्ये या कुत्र्यांनी तब्बल ५ जणांवर हल्ला चढवला. यात पाचही जण जखमी झाले असून, त्‍यांना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

बाळापूरमध्ये शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास पिसाळलेल्या ३ ते ४ कुत्र्यांनी वैभव अरुण निंभोरे (वय १७), स्वराज अमोल निंभोरे (वय ५) नंदिनी विजय निंभोरे (वय ५ ) या तिघांना चावा घेतला. वैभवच्या गालाचे तर नंदिनी व स्वराजच्या पाठीचे व कमरेचे लचके तोडले. त्यांना कुटुंबीयांनी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र या रुग्णांना जे रेबिजचे इंजेक्शन द्यायचे, ते उपलब्ध नसल्याने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्याची वेळ आली.

आसडी येथे नर्मदाबाई नंदकिशोर गायकवाड (वय ५५) व सिल्लोड येथील आव्हाना रोड भागातील प्रतिक सुखदेव सोनवणे (वय २४) यालाही शनिवारी सकाळी पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला. त्यांनाही छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेबद्दल उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. रोहन राऊत म्हणाले, की जखम मोठी व मेंदू जवळ असल्याने रुग्णांना इम्यून ग्लोब्युलिन रेबीज इंजेक्शन देणे गरजेचे होते. त्यामुळे रुग्ण छत्रपती संभाजीनगरला पाठवावे लागले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध

Latest News

वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाजप जिल्हा उपाध्यक्ष कल्याण दांगोडे यांची...
धुलिवंदन : प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांनी केले शहरवासियांना अलर्ट, म्हणाले, रासायनिक रंगांपासून सावध राहा!
खुलताबादच्या लॉजवर २२ वर्षीय तरुणीवर २९ वर्षीय तरुणाचा बलात्कार!; ब्रेकअपनंतर व्हिडीओ, फोटो डिलीट करण्यासाठी एकदा शरीरसंबंधाची घातली होती अट...
धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!
दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software