शेडचा दरवाजा उघडताच फुत्कार टाकत नागाने कपाळाच्या मध्यभागी घेतला चावा!; शेतकऱ्याचा तासभरातच तडफडून मृत्‍यू!!, सोयगाव तालुक्‍यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : निंबायती (ता. सोयगाव) येथील शेतकरी गजानन हरिबा शेवरे (वय ५५) यांना नागाने कपाळाच्या मध्यभागी दंश केला. तासभरात त्‍यांचा मृत्‍यू झाला. ही घटना शुक्रवारी (१९ सप्‍टेंबर) दुपारी ३ च्या सुमारास धिंगापूर (ता. सोयगाव) शिवारात घडली.

शेवरे हे शेतात जनावरांना वैरण टाकण्यासाठी शेडचा दरवाजा उघडत होते. त्‍याचवेळी दरवाजामागे बसलेल्या सापाने त्यांना दंश केला. नातेवाइकांनी त्‍यांना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र तासभरातच त्‍यांचा मृत्‍यू झाला. रात्री आठला अंत्‍यसंस्कार करण्यात आले. शेवरे यांच्या पश्चात पत्‍नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंब कर्जबाजारी असल्याने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोलिसांसह महसूल आणि कृषी विभागाने घटनेचा पंचनामा केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!

Latest News

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ! वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा...
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
कांचनवाडीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या युवकावर पोलिसांनी घातली झडप!, व्हॉट्‌स ॲप चॅटिंगमध्ये झाला धक्कादायक उलगडा...
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software