सिल्लोडनंतर वैजापूरमध्येही सेक्स रॅकेट; राधिका लॉजमधून एका तरुणीची सुटका

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील मुख्य चौकातील जुने बसस्थानक परिसरातील राधिका लॉजवर सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्या पथकाने छापा मारून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या ठिकाणावरून एका तरुणीची सुटका केली. दोघांना ताब्‍यात घेतले आहे. लॉजच्या नावाखाली काही महिन्यांपासून या ठिकाणी खुलेआम वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. सोमवारी (१ जुलै) सायंकाळी ही कारवाई करण्यात […]

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील मुख्य चौकातील जुने बसस्थानक परिसरातील राधिका लॉजवर सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्या पथकाने छापा मारून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या ठिकाणावरून एका तरुणीची सुटका केली. दोघांना ताब्‍यात घेतले आहे. लॉजच्या नावाखाली काही महिन्यांपासून या ठिकाणी खुलेआम वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. सोमवारी (१ जुलै) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

सेक्स रॅकेट चालवणारे सचिन लक्ष्मण खंडागळे व आकाश चंद्रकांत वाघ (दोघे रा. इंदिरानगर) यांच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधिका लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आधी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेण्यात आली. त्यानंतर पथकाने छापा मारला. या ठिकाणी एका तरुणीकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. तिची सुटका करण्यात आली. पोलिसांनी एकूण ३५ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Latest News

विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना विधवेचे केस धरून ओढले, धक्काबुक्की, पुढे युवकाची हिंमत वाढतच गेली... वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...
कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software