- News
- जिल्हा न्यूज
- तणावाच्या पार्श्वभूमीवर वैजापूरमध्ये जमावबंदी लागू; आजचा सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा पुढे ढकलल...
तणावाच्या पार्श्वभूमीवर वैजापूरमध्ये जमावबंदी लागू; आजचा सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा पुढे ढकलला, शहरात तणावपूर्ण शांतता, व्यवहार सुरळीत
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : तणावाच्या पार्श्वभूमीवर वैजापूरमध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी मध्यरात्रीपासून जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश आज, १६ ऑगस्टपासून १९ ऑगस्टपासून लागू असेल. त्यामुळे सकल हिंदू समाजाचा मोर्चाही बारगळला असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीमुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मोर्चाच्या संयोजकांनी सीएससीएसनशी बोलताना दिली. ग्रामीण पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी नागरिकांना […]
वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : तणावाच्या पार्श्वभूमीवर वैजापूरमध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी मध्यरात्रीपासून जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश आज, १६ ऑगस्टपासून १९ ऑगस्टपासून लागू असेल. त्यामुळे सकल हिंदू समाजाचा मोर्चाही बारगळला असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीमुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मोर्चाच्या संयोजकांनी सीएससीएसनशी बोलताना दिली. ग्रामीण पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी नागरिकांना अफवावर विश्वास न ठेवण्याचे व चुकीचे मेसेज फॉरवर्ड न करण्याचे आवाहन केले आहे.
वैजापूर तालुक्यातील एका प्रसिद्ध महाराजांनी सप्ताहातील मार्गदर्शनात विशिष्ट समाजातील धर्म संस्थापकासह त्या धर्माविरुद्ध आक्षेपार्ह टीकाटिप्पणी केल्याने वैजापूर शहरात आज, १५ ऑगस्टला रात्री तणाव निर्माण झाला. विशिष्ट समाजाचा दीड ते दोन हजार लोकांचा जमाव डॉ. आंबेडकर चौकात जमला आणि घोषणाबाजी सुरू केली. रात्री आठपासून जमावाने रास्ता रोको करत चौकात ठाण मांडले होते. महाराजांविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी जमावाने आक्रमक रुप धारण केले होते. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जमावाची समजूत काढत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला. मात्र घोषणाबाजीने तणावात भर घातली होती. शेवटचे वृत्त पावणेअकराला हाती आले तेव्हा जमाव पांगविण्यात आला असून शहरात तणावपूर्व शांतता आहे.
रात्री शहरात शहरात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी वेळीच आवश्यक पावले उचलून नियंत्रण मिळवले. आज, १६ ऑगस्टला शहराचे व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. बाजारपेठेसह, शहरातील सर्व दुकानेही उघडली आहेत. मात्र तणावपूर्ण वातावरण आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी मध्यरात्री १२ पासूनच जमावबंदी आदेश १९ ऑगस्टपर्यंत लागू केला आहे. त्यामुळे सकल हिंदू समाजाचा मोर्चा पुढे ढकलण्याची विनंती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मोर्चाच्या संयोजकांना केली. संयोजकांनी आजचा मोर्चा स्थगित केला आहे. मोर्चा रद्द होण्याची शक्यता कालच्या बातमीतच सीएससीएनने वर्तवली होती. मोर्चा रद्द झाला नसता तर बंदोबस्तावर मोठा ताण आला असता. बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात या मोर्चाचे आयोजन केले होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
Latest News
03 Mar 2026 10:53:01
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील परिसरातील ४ घटनांनी सध्या सारेच हादरले आहेत. यातल्या ३ घटना तर रांजणगाव...

