कडाक्याच्या थंडीत उपोषणार्थी महिलांनी भजनातून मिळवली ऊर्जा!, निर्लज्ज पदाधिकारी पांघरुणात!!, वडगाव कोल्हाटीच्या आंदोलनाप्रती सहानुभूतीची लाट, पदाधिकाऱ्यांवर संताप

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुलभूत सुविधांसाठी वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर ९ भागातील महिलांनी काल, ११ डिसेंबरपासून उपोषणास्‍त्र उपसले आहे. रात्री अन्‌ आज सकाळी कडाक्याच्या थंडीने महिला कुडकुडत होत्या, पण लाज सोडलेल्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्याकडे पहायलाही वेळ मिळाला नाही. निवडणुकीत मतांसाठी दारोदार भटकणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या या वर्तनाबद्दल संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे महिलांनी काल रात्री थंडीचा सामान भक्‍तीऊर्जेने केला. उपोषणस्थळी सारेच भजनात तल्लीन झालेले पहायला मिळाले.

पाणी, रस्ते आणि ड्रेनेज या ३ मुलभूत गरजांसाठी अनेक वर्षे ग्रामपंचायतीकडे उंबरठे झिजवल्यानंतर महिलांनी उपोषण सुरू केले आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस असून, अगदी घरातही लोक कुडकुडत आहेत, तर दुसरीकडे या ३० ते ३५ महिला उघड्यावर उपोषण करताना आज सकाळी थंडीत अक्षरशः कुडकुडत होत्या. रात्री या भागातील पुरुष मंडळींनी पुढाकार घेत भजनी मंडळाने आमंत्रित करून महिलांना भक्तीची ऊर्जा देण्याचे काम केले. रात्रभर सुरू राहिलेल्या या भजन-कीर्तनामुळे उपोषणस्थळी भावनिक ऊब मिळाली. ज्योती मारोती कांबळे यांच्या नेतृत्वात ३० ते ३५ महिला उपोषणाला बसल्या आहेत. सर्व कर भरत असूनही मुलभूत सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरत असल्याची तक्रार या उपोषणकर्त्या महिलांची आहे. जोपर्यंत लेखी दिले जात नाही तोपर्यंत आता माघार घ्यायची नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. एकता, श्रद्धा आणि संघर्षाची भावना अधिक मजबूत होताना दिसत आहे. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software