कर्णपुरा यात्रोत्सवासाठी प्रशासन लागले तयारीला!; यंदा साध्या वेशातील पोलीस असतील जागोजागी!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : कर्णपुरा यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आज, १८ सप्‍टेंबरला घेण्यात आला. यात्रेत येणाऱ्या भाविकांना सुरक्षा, स्वच्छता आदी सेवा देतानाच यात्रेच्या निमित्ताने जमणाऱ्या भाविकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

कर्णपुरा यात्रा पूर्वतयारी आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, मनपा अप्पर आयुक्त रणजीत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, वाहतूक शाखा उपायुक्त भुजंग तसेच अन्न औषध प्रशासन विभाग, विज वितरण कंपनी, अग्निशमन विभाग, महानगरपालिकेचे सर्व विभाग तसेच छावणी परिसराचे अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, यात्रोत्सवात पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छता सुविधा, आरोग्य सुविधा व सतर्क पोलीस यंत्रणा यांची सज्जता असावी. सर्व विभागांचा मिळून एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापित करावा. खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडील पदार्थांची तपासणी करावी. रुग्णवाहिका व अग्निशमन बंब वाहतुकीसाठी पुरेसी जागा असावी. यात्रोत्सवातील आवश्यक परवानग्यांसाठी यात्रा स्थळीच कक्ष स्थापन करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. पोलीस दलाने सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवावी. सीसीटीव्ही कॅमेरे लावून गर्दीवर नियंत्रण ठेवावे. दामिनी पथक तैनात ठेवावे. याशिवाय साध्या वेशातील पोलीस सज्ज ठेवावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
गेल्या वर्षी पार्किंगसाठी भाविकांची झाली होती लूट...
गेल्या वर्षी पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची लूट ठेकेदाराने केली होती. यंदाही तसा प्रकार घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे जिल्हाधिकारी स्वामी यांनी आधीच यंत्रणेला सूचना कराव्यात. जेणेकरून भाविकांची लूट होऊ नये. पार्किंग शुल्‍क हे अव्वाच्या सव्वा नसावे, अशी अपेक्षा भाविकांनी केली आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!

Latest News

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ! वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा...
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
कांचनवाडीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या युवकावर पोलिसांनी घातली झडप!, व्हॉट्‌स ॲप चॅटिंगमध्ये झाला धक्कादायक उलगडा...
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software