डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा दीक्षांत समारंभ ५ जानेवारीला होणार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा दीक्षांत समारंभ नवीन वर्षाच्या  पहिल्याच आठवड्यात होणार आहे. कुलपती तथा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अध्यक्षतेखाली ५ जानेवारी २०२७ रोजी हा सोहळा होणार असून, पुणे येथील राष्ट्रीय संस्था ‘आयसर'चे संचालक डॉ. सुनील भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत राहणार आहेत.

विद्यापीठाच्या नाट्यगृहात हा सोहळा ५ जानेवारीला सकाळी ११ वाजता होणार आहे. कार्यक्रमाला अध्यक्ष व पाहुण्यांसह कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्र- कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांच्यासह चारही विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कुलपती तथा राज्यपाल आचार्य देवव्रत हे पहिल्यांदाच विद्यापीठात येणार आहेत. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर, पुणे) संचालक डॉ. सुनील भागवत प्रमुख पाहुणे म्हणून दीक्षांत भाषण देणार आहेत. दीक्षांत समारंभात ऑक्टोबर- नोव्हेंबर २०२४ व मार्च-एप्रिल २०२५ या परीक्षेत उत्तीर्ण पदवीधारकांना पदव्यांचे वितरण करण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षेत पदविका, पदवी, पदव्यूत्तर पदवी प्राप्त विद्यार्थी तसेच २३ फेब्रुवारी २०२५ ते आजपर्यंत एम.फिल., पीएच.डी प्राप्त करणाऱ्या संशोधकांना  पदव्यांचे वितरण करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी कळविले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर फडकला भाजपचा झेंडा!; मध्यरात्रीतून मंत्री सावेंनी गणित जुळवले, भाजपचे गलांडे-जैस्वाल अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध झाले!!

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर फडकला भाजपचा झेंडा!; मध्यरात्रीतून मंत्री सावेंनी गणित जुळवले, भाजपचे गलांडे-जैस्वाल अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध झाले!! छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर फडकला भाजपचा झेंडा!; मध्यरात्रीतून मंत्री सावेंनी गणित जुळवले, भाजपचे गलांडे-जैस्वाल अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध झाले!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शिंदे गटाच्या प्रयत्नांना सुरूंग लावत, 'जादूची कांडी' फिरवून भारतीय जनता पक्षाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा...
कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन शाखेत ब्रँच मॅनेजरनेच केला घोटाळा!; वाळूज MIDC पोलिसांत गुन्हा दाखल
हिंदू नववर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात उद्या शोभायात्रा, खैरेंनी मंत्री शिरसाट, सावे, अंबादास दानवेंना केले ‘हे’ आवाहन...
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software