माझी तक्रार गैरसमजूतीतून : तरुणाचे स्पष्टीकरण, जाधवाडीतील केंद्रावर बांधकाम मजुरांना सुरळीत वाटप, अडवणूक नाही; केंद्रचालकांचे स्पष्टीकरण

On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सध्या बांधकाम मजुरांना सरकारकडून बांधकाम कामगार योजनेद्वारे संसार उपयोगी (भांडी) वस्तूंचे वाटप केले जात आहे. जाधववाडीतील केंद्रावर आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार एका बांधकाम मजूर महिलेच्या मुलाने सिडको पोलीस ठाण्यात केली होती. त्यावरून पोलिसांनी अनोळखी ३ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र आता त्या तरुणाने तक्रार मागे घेतली असून, गैरसमजुतीतून तक्रार दिल्याचे लेखी दिले आहे. तक्रार मागे घेत असल्याचेही या पत्रात म्हटले आहे. दुसरीकडे, या केंद्राचे चालक युवराज वाकेकर यांनी सीएससीएनशी बोलताना सांगितले, की केंद्रावर बांधकाम मजुरांना सुरळीत वाटप होत असून, आमच्याकडून पूर्णपणे सहकार्य केले जात आहे. तरुणाने खोटी तक्रार गैरसमजुतीतून केली होती. हे त्या तरुणानेच नंतर कबूल केले आहे.

सुरज ज्ञानेश्वर राजपूत (वय २७, रा. हर्सूल, पिसादेवी रोड) याने या प्रकरणात तक्रार दिली होती. त्याची आई बांधकाम कामगार असून, त्यांनी बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म गेल्या वर्षी भरला होता. त्यावरून २४ ऑगस्टला ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतल्यानंतर त्यांच्या मोबाइलवर घरसंसार उपयोगी वस्तू मिळण्याबाबत पावती मिळाली. मंगळवारी सकाळी १० ला सुरज व त्‍याची आई जाधववाडीत आले. तिथे बांधकाम कामगार योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या घरसंसार उपयोगी (भांडी) वस्तू घेण्यासाठी दोघे मायलेक रांगेत लागले. दुपारी साडेतीनला सुरजच्या आईचा भांडे घेण्यासाठी काउंटरजवळ नंबर आला. तेव्हा त्यांनी विचारले की, तुमच्याकडे घोषणापत्र आहे का? घोषणापत्र असेल तरच तुम्हाला भांडे देण्यात येईल. नाहीतर तुम्हाला भांडे देता येणार नाही. त्यावर सुरज म्हणाला, की वेबसाईटवर घोषणापत्रच नाही. मी ते कसे देऊ? त्यावर त्याठिकाणी वाद होऊन दोन ते तीन अनोळखी व्यक्तींनी मारहाण करून जखमी केल्याची तक्रार सुरजने केली होती. त्यावरून पोलिसांनी ३ अनोळखी व्यक्‍तींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
आता ती तक्रारच गैरसमजुतीतून दिल्याचे सुरजनेच लेखी दिले आहे. सुरजने आता म्हटले आहे, की वाद सुरू असताना माझी आई खाली पडली. माझ्या खांद्याला काहीतरी लागून मार लागला. मला असे वाटले, की त्या व्यक्तीने हातातील कडे मारले आहे. पण त्याने कडे मला मारले नाही. मी गैरसमजुतीतून तक्रार दिली. वाद घालणाऱ्यांनीही दिलगिरी व्यक्‍त केल्याने मला तक्रार मागे घ्यायची असल्याचे सुरजने पोलिसांना लेखी दिले आहे.
गृहपयोगी संचाचे वाटप पूर्णतः नि:शुल्क
आमच्या वितरण केंद्रांवर बांधकाम मजुरांना गृहपयोगी संचाचे वाटप केले जात आहे. हे वितरण पूर्णतः निःशुल्क असून आमच्याकडून बांधकाम मजुरांना जेवढे सहकार्य करता येईल तेवढे करत आहोत. वितरण सुरळीत करत आहोत. अनेकदा मजुरांमध्ये वाद होतात, पण त्यातही आम्ही हस्तक्षेप करून वाद मिटवतो आणि तक्रारी सोडवतो, असे श्री. वाकेकर यांनी स्पष्ट केले आहे.

कसे होते वाटप?
संच वाटप Appointment System ने होत असून, लाभार्थ्यांनी http://hikit.mahabocw.in/appoinment या संकेतस्थळावर भेट देऊन नियोजित वेळ घेऊन संच मिळवण्यासाठी दिनांक व वितरण केंद्राची निवड करावी लागणार आहे. कामगारांनी ओळखपत्र/आधारकार्ड व नियुक्ती पत्र घेऊन उपस्थित राहिल्यानंतरच संच प्रत्यक्ष दिला जाईल.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Adhyatm : शारदीय नवरात्रात माँ दुर्गेचे कोणत्या वाहनाने आगमन अन्‌ प्रस्थान होईल?, त्याचा काय परिणाम होईल?

Latest News

Adhyatm : शारदीय नवरात्रात माँ दुर्गेचे कोणत्या वाहनाने आगमन अन्‌ प्रस्थान होईल?, त्याचा काय परिणाम होईल? Adhyatm : शारदीय नवरात्रात माँ दुर्गेचे कोणत्या वाहनाने आगमन अन्‌ प्रस्थान होईल?, त्याचा काय परिणाम होईल?
लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. २२ सप्टेंबरपासून माँ दुर्गा तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत आहे. माँ दुर्गेच्या या दिवसांमध्ये,...
Special interview : अभिनेत्री वाणी कपूरने दिला कानमंत्र; धीर ही अशी किल्ली, जी प्रत्येकाच्या नशिबाचे कुलूप उघडू शकते!
ट्रकच्या धडकेने चिकलठाण्याजवळ पादचारी मजुराचा मृत्‍यू
मोठी बातमी : हर्सूल जेलमध्ये ५ कैद्यांचा राडा!; तुरुंगाधिकाऱ्यांना मारहाण, इतके आक्रमक झाले की कर्मचाऱ्यांनाही ऐकत नव्हते..., नक्की काय अन्‌ कशामुळे घडलं जाणून घ्या...
वेळेत पोलिसांची गाडी आल्याने कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांची लूट टळली!; तिघांना अटक, धूत हॉस्पिटलसमोरील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software