दिवाळीपूर्वी होणार मनपाच्या २ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post


छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : महापालिकेतील २ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार ५ महिन्यांपासून थकला आहे. तो आता दिवाळीपूर्वी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचे आदेश महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी सोमवारी (६ ऑक्‍टोबर) मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांना दिले आहेत.
मनुष्यबळ पुरविणाऱ्या एजन्सी आणि महापालिका प्रशासन यांच्यात सध्या वाद सुरू आहे. त्यामुळे दोन हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचारी ५ महिन्यांपासून वेतनाविना आहेत. या वादात दोन छोट्या एजन्सींकडे कर्मचारी वर्ग करण्यात आले होते. सुरुवातीला दोन महिन्यांचा अॅडव्हान्स पगार देण्याची तयारी दर्शवणाऱ्या या दोन्ही एजन्सींनी पगार देण्याची वेळ आल्यावर माघार घेतली. त्‍यामुळे कर्मचारी घायकुतीला आले आहेत. या कर्मचाऱ्यांचा पगार करायला महिन्याकाठी किमान ५ कोटी रुपये लागतात, असे सूत्रांकडून समजते. पगार मिळत नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनही केले. अखेर आता दिवाळीपूर्वी त्‍यांचा पगार होईल, अशी आशा व्यक्‍त केली जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश

Latest News

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आवश्यक आहे. त्यात सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा...
पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन
घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक...
आधी कोण?; अध्यक्षपदासाठी भाजप, शिंदे गटात रंगली वर्चस्वाची लढाई, ठाकरे गटाच्या आशा पल्लवीत... उद्या काय होणार?
खडकेश्वरमधील ती काळरात्र... २ भंगारवेचकांच्या अंगावरून चारचाकी गेली... एकाचा मृत्यू, दुसरा जखमी; जगण्यासाठीची धडपड थांबली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software