रांजणगाव शेणपुंजीमध्ये अवैध दारूविक्रीविरुद्ध ग्रामस्थ एकवटले!; २२ डिसेंबरपासून गावबंदचा इशारा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजीतील ग्रामस्थांनी अवैध दारू विक्रीविरोधात लढा उभारला असून, प्रशासनाने दखल घेतली नाही तर २२ डिसेंबरपासून बेमुदत गावबंद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला ग्रामपंचायतीची साथ आहे. आजी-माजी सरपंच महिलांनीही या विषयावर कठोर पावले उचलण्याची भूमिका जाहीर केली आहे.

रांजणगाव शेणपुंजीमध्ये सर्रास अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक वातावरण बिघडत चालल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रहिवासी भागातच खुलेआम दारू दुकाने सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.  शाळा, मंदिर व मशिदींच्या अगदी जवळच अवैध दारू विक्री होत असून, दारूडे सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालतात. महिलांची छेड काढतात. अश्लील चाळे करतात. त्यामुळे नागरिकांत संताप आहे. नशेत वाहन चालवण्याच्या प्रकारांमुळे अपघातही वाढले आहेत. अवैध दारू विक्री तातडीने बंद करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्‍त, तहसीलदार, पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.

गावबंद आंदोलन काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासनाने अवैध दारू विक्री बंद केली नाही तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका माजी सरपंच योगिता महालकर यांनी घेतली असून, वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसेल तर ग्रामपंचायतीला कठोर पावले उचलावीच लागतील, असा इशारा सरपंच कविता हिवाळे यांनी दिला आहे. ग्रामस्थांच्या आंदोलनाला विविध संस्था, संघटनांना पाठिंबा मिळू लागल्याने हे आंदोलन व्यापक रुप धारण करणार असल्याचे चित्र आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software