हलगर्जीपणामुळे वाभाडे निघाल्यानंतर अधिष्ठाता डॉ. सुक्रेंना उपरती!; घाटीत यापुढे रात्री येणाऱ्या रुग्णांना १२ तास देखरेखीखाली ठेवणार!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ‘नॉर्मल’ म्हणून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णाचा दोन तासांत मृत्यू झाल्याच्या घटनेने घाटी रुग्णालयाच्या कारभाराचे वाभाडे काढले. स्वतःची जाहिरातबाजी करण्यात पुढे असलेल्या अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांचे नियंत्रण राहिले नसल्याची टीका सुरू झाली. त्यानंतर आता उपरती होऊन डॉ. सुक्रे यांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नवीन नियमावली जारी केली असून, रात्री ८ नंतर येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला किमान १२ ते २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हे नियम लावले...
-रात्रीच्या वेळी अपघात विभागात वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी कर्तव्यावर हजर राहणे अनिवार्य.
-रुग्णसेवेत हलगर्जीपणा करणाऱ्या किंवा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या निवासी डॉक्टरांना तत्काळ सेवामुक्त करणार.
-हलगर्जीपणा करणाऱ्या निवासी डॉक्टरांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करणार.
डॉ. सुक्रे म्हणाले...
रात्री येणारे रुग्ण आजाराने पीडित आणि मानसिकदृष्ट्या घाबरलेले असल्याने त्यांच्या लक्षणांनुसार त्यांना किमान १२ तास रुग्णालयात दाखल करून घेणे बंधनकारक केले आहे.

काय घडली होती घटना...
छातीत दुखत असल्याने १३ डिसेंबरला पहाटे ४ च्या सुमारास प्रकाश तुळशीराम गायकवाड (वय ४२, रा. हर्सूल) यांना कुटुंबीयांनी घाटीत आणले होते. ऑन ड्युटी डॉक्टरने तपासणी करून ईसीजी काढला, रक्तदाब तपासला. नॉर्मल असल्याचे सांगत गोळ्या लिहून देत ॲडमिट करून घेण्याऐवजी रुग्णाला घरी घेऊन जाण्यास सांगितले. मात्र रुग्णाच्या छातीत दुखणे, अस्वस्थता होती. घरी गेल्यानंतर पुन्हा छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यामुळे सकाळी ७ ला पुन्हा घाटी रुग्णालयात आणले असता रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाइक संतप्त झाले होते. या प्रकरणात घाटी प्रशासनाने ५ डॉक्टरांची चौकशी समिती नेमली असून, ८ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. ८ दिवस उलटल्यानंतर समितीने अहवाल काय म्हटले, चौकशी निःपक्ष झाली का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डॉ. सुक्रे यांची कारकीर्द वादग्रस्त...
डॉ. सुक्रे हे अधिष्ठाता झाल्यापासून घाटी रुग्णालय प्रशासनावर त्यांचे नियंत्रण नसल्याची चर्चा आहे. घाटी रुग्णालयातील पार्किंग शुल्काच्या निर्णयावरही त्यांच्यावर मोठी टीका झाली. याशिवाय त्यांच्यावर गैरव्यवहाराचेही आरोप आहेत. घाटी रुग्णालयातील गैरव्यवहाराची चौकशी व्हावी म्हणून आ. प्रदीप जैस्वाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणीही केली होती. त्‍यांच्याशिवाय अभ्यागत समितीचे माजी सदस्य प्रवीण शिंदे यांनी डॉ. सुक्रे यांच्या कार्यकाळात नियमबाह्य कामे झाल्याचा आरोप केला होता. अधिष्ठातांच्या कार्यालयावर अंदाजे २० लाख खर्च करण्यात आला असून, खर्चाची कागदपत्रे लेखापरीक्षण अधिकाऱ्यास देण्यात आली नाहीत. ई-ऑफिस, ई-हॉस्पिटल, ई-लायब्ररी सुरू करण्यासाठीसुद्धा मोठा खर्च केला आहे. जीईएम पोर्टलवरून संगणक खरेदी करताना स्थानिक बाजार भावापेक्षा दुप्पट किमतीने संगणक खरेदी केले आहे. लेखापरीक्षण अहवालातही गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत, असे आरोप डॉ. सुक्रेंवर झाले आहेत. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software