‘घाटी’ला लागलं भिकारचळ, रुग्णांच्या गरीब नातेवाइकांना लुटणार, पार्किंगसाठी १० रुपये घेणार!, वादग्रस्त अधिष्ठाता डॉ. सुक्रेंचा निर्णय

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : गैरव्यवहाराचे आरोप झाल्यामुळे काही महिन्यांपूर्वी वादात सापडलेले, बदलीची मागणी होऊनही सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त लाभल्याने घाटी रुग्णालयात चिकटून बसलेले घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी आता थेट रुग्णांच्या गरीब नातेवाइकांच्या खिशावर डल्ला मारण्याची योजना आखली आहे. वास्तवात घाटीसारख्या सरकारी रुग्णालयात पार्किंगसाठी कोणतेही शुल्क आकारायला नको. पण घाटीत खासगी रुग्णालयांप्रमाणे पार्किंग शुल्क द्यावे लागणार आहेत. दुचाकीसाठी १० रुपये, तर चारचाकींसाठी २० रुपये शुल्क घेण्याचा निर्णय डॉ. सुक्रेंनी घेतला आहे.

१ जानेवारीपासून हा नवीन नियम अंमलात येईल, अशी माहिती घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी पत्रकारांना दिली. यामुळे संतापाची लाट उसळली आहे. घाटी रुग्णालयात रोज ५०० हून अधिक वाहने येत असतात. पार्किंगची सुविधा सध्या मोफत आहे. त्यामुळे गाड्या अस्ताव्यस्त लावल्या जातात, दुचाकी चोरीची समस्या उद्‌भवल्याचे कारण पार्किंग शुल्कामागे देण्यात आले आहे. आपल्या यंत्रणेकडून वाहनधारकांना शिस्त लावणे, दुचाकी चोरी होणार नाही यासाठी सुरक्षा यंत्रणा बळकट करणे या उपाययोजना करण्याऐवजी डॉ. सुक्रे यांनी खेड्यापाड्यातून येणाऱ्या रुग्णांच्या गोरगरीब नातेवाइकांची लूट करण्याचा जालीम उपाय शोधला आहे. पार्किंगसाठी दर निश्चित झालेले नाहीत, मात्र नाममात्र दर ठेवले जाणार आहेत, असे डॉ. सुक्रे यांनी स्पष्ट केले, मात्र खासगी रुग्णालयासारखे दर आकारून पार्किंग कंत्राटदाराचा गल्ला भरण्याचे काम होणार आहे.

डॉ. सुक्रेंवर झाले गैरव्यवहाराचे आरोप...
डॉ. सुक्रे हे वादग्रस्त अधिष्ठाता आहेत. त्यांच्यावर यापूर्वी गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. मात्र मंत्र्यांच्या वरदहस्ताने ते खुर्चीला चिकटून बसले आहेत. याचाच फायदा उचलून आता मनमानी नियम लावण्याचे त्यांचे मनसुबे दिसत असल्याचा आरोप रुग्णांचे नातेवाइक करत आहेत. घाटी रुग्णालयातील गैरव्यवहाराची चौकशी व्हावी म्हणून आ. प्रदीप जैस्वाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. अभ्यागत समितीचे माजी सदस्य प्रवीण शिंदे यांनीही डॉ. सुक्रे यांच्या कार्यकाळात नियमबाह्य कामे झाल्याचा आरोप केला होता या कामांचे विशेष लेखापरीक्षण करण्याची मागणी त्‍यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे केली होती. त्यावेळी डॉ. सुक्रे यांनीही व्हॉट्‌स ॲपवर पोस्ट टाकून थेट आ. जैस्वाल यांच्यावर आरोप केले होते. मात्र मंत्र्यांचे पाठबळ डॉ. सुक्रे यांना मिळत गेले आणि ते घाटीला ओरबाडल्यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांचीही आर्थिक लूट करण्यापर्यंत उतरले असल्याचा आरोप होत आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!

Latest News

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ! वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा...
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
कांचनवाडीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या युवकावर पोलिसांनी घातली झडप!, व्हॉट्‌स ॲप चॅटिंगमध्ये झाला धक्कादायक उलगडा...
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software