कर्णपुरा यात्रेत पार्किंग शुल्‍काची दुपटीने वसुली!; कंत्राटदाराकडून भाविकांची लूट, सरकारवर ताशेरे ओढणारे आ. दानवे लक्ष घालणार?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कर्णपुरा यात्रेत सकाळपासून गर्दी उसळत आहे. लाखावर भाविक रोज दर्शनासाठी येत आहेत. त्‍यांची पार्किंगच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. छावणी परिषदेला या कंत्राटदाराला ९० लाखांत हे कंत्राट दिले आहे. ते वसूल करण्याच्या नादात कंत्राटदाराने मनमानी चालवली असल्याचा आरोप भाविकांकडून केला जात आहे. जनतेला होणाऱ्या त्रासाबद्दल सरकारला धारेवर धरणारे आ. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कर्णपुरा यात्रेत सकाळपासून गर्दी उसळत आहे. लाखावर भाविक रोज दर्शनासाठी येत आहेत. त्‍यांची पार्किंगच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. छावणी परिषदेला या कंत्राटदाराला ९० लाखांत हे कंत्राट दिले आहे. ते वसूल करण्याच्या नादात कंत्राटदाराने मनमानी चालवली असल्याचा आरोप भाविकांकडून केला जात आहे. जनतेला होणाऱ्या त्रासाबद्दल सरकारला धारेवर धरणारे आ. अंबादास दानवे कर्णपुरा यात्रेतील भाविकांची ही लूट थांबविणार का, असा प्रश्न भाविकांनी केला आहे.

पार्किंगसाठी ४ ठिकाणी व्यवस्था असून, अव्वाच्या सव्वा वसुली केली जात आहे. शहरात कुठेही दुचाकी पार्किंगसाठी १० रुपये व चारचाकीसाठी २० रुपये घेतले जातात. यात्रेत मात्र दुचाकीसाठी २० रुपये अन्‌ चारचाकीसाठी ५० रुपयांची वसुली सुरू आहे. विशेष म्‍हणजे दुचाकीच्या पावतीवर पार्किंग शुल्काचा उल्लेख नाही. यामुळे पावत्‍या देण्यासाठी कंत्राटदाराने अक्षरशः गुंड नेमल्याचे चित्र असून, ते वाहनधारकांना दमदाटी, शिवीगाळ करत असल्याचे चित्र दिसून आले आहे. लोक श्रद्धेने येत आहेत, मात्र छावणी परिषदेच्या आडून कंत्राटदाराने लुटीचे केंद्र बनवले आहे. दरम्‍यान, एका वृत्तपत्राने याबाबत छावणी परिषदेच्या कार्यालय अधीक्षक वर्षा केणेकर यांना विचारणा केली असता त्‍यांनी टेंडरमध्ये ठरल्याप्रमाणे पार्किंग शुल्‍क आकारण्याचा अधिकार ठेकेदाराला आहे. तसे नसल्यास कारवाई करण्यात येईल, असे त्‍यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

३ अपघातांत एक ठार, ३ गंभीर जखमी, पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्यातील दुर्घटना

Latest News

३ अपघातांत एक ठार, ३ गंभीर जखमी, पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्यातील दुर्घटना ३ अपघातांत एक ठार, ३ गंभीर जखमी, पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्यातील दुर्घटना
पैठण/सिल्लोड /गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टिप्पर आणि इको व्हॅन समोरासमोर धडकून व्हॅनमधील दोघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात...
तरुण पिढीला हे झालंय काय?; १७ वर्षीय मुलीने स्वतःला पेटवून घेतले, एका मुलाने विष पिले, दोघांनी घेतला गळफास!; वाळूज MIDC परिसरातील घटनांनी समाजमन हेलावले...
छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला आला सक्षम पर्याय!;  इस्लाम पक्षाची दणक्यात एंटी!!; कटकटगेट भागातील इफ्तार पार्टीला आले पक्षप्रमुख शेख आसीफ... भाजप, MIM वर सोडले टीकास्त्र 
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
धुलिवंदन : प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांनी केले शहरवासियांना अलर्ट, म्हणाले, रासायनिक रंगांपासून सावध राहा!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software