दारू पैसे न दिल्याने तरुणाला फायटरने मारहाण, २ टवाळखोरांचे कृत्‍य, जटवाडा रोडवरील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दोन टवाळखोरांनी दारूसाठी पैसे मागत २२ वर्षीय तरुणाला फायटरने मारहाण करून जखमी केले. ही घटना जटवाडा रोडवरील एकतानगरात गुरुवारी (११ डिसेंबर) रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली.

शुभम शांताराम जंजाळ (वय २२, रा. राधास्वामी कॉलनी, हर्सूल) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो मनपा सिटीबसचा वाहक म्हणून नोकरी करतो. गुरुवारी (११ डिसेंबर) रात्री पावणेनऊला शुभम मोटारसायकलीने एकतानगर जटवाडा रोडवरील आसर क्लिनिकमध्ये पोट दुखत असल्याने उपचारासाठी गेला होता. तिथून घरी परतत असताना आसर क्लिनिकसमोर त्याला ओळखीचे चेतन चौधरी व आकाश साबरे (दोघे रा. एकतानगर हर्सूल) भेटले. त्यांनी शुभमला दारू पिण्यासाठी पैसे मागितले.

शुभमने पैसे नसल्याचे सांगितल्यावर दोघांनी शिवीगाळ करून हाताचापटांनी मारहाण केली. चेतनने जवळील फायटर काढून त्याच्या तोंडावर मारले. आकाशने मोटारसायकल लाथ मारून पाडली. शुभमला लोटून दिले. त्याच्या खिशातील मोबाइल पडून डिस्प्ले खराब झाला. मोटारसायकलीचेही दोघांनी नुकसान केले. धमकी देऊन दोघे तेथून निघून गेले. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शुभमने हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चेतन व आकाशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार पोपट दहिफळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला

Latest News

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्यासाठीची विशेष सभा बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी...
Good News : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक सांधेरोपण तज्‍ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य उद्या, १२ मार्चला छत्रपती संभाजीनगरात
छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत गर्भपाताच्या प्रयत्नामुळे विवाहिता पोहोचली मृत्यूच्या दाढेत!; मृत्यूचा खेळ खेळणारे त्रिकूट पोलीस आल्याचे पाहून पळाले... नारेगावच्या घटनेने शहरात खळबळ
दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू
महिलेची हत्या करून पळून जाणाऱ्या मारेकऱ्याला छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर पकडले!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software