शाळेत ड्युटीसाठी निघालेल्या २ तरुणींच्या स्कुटीला मागून सुसाट दुचाकीची धडक, दोघींसह दुचाकीवरील दोघेही जखमी, बीड बायपासची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शाळेत ड्युटीला स्कुटीने निघालेल्या २ तरुणींना मागून सुसाट येणाऱ्या मोटारसायकलस्वाराने उडवले. यात दोघी जखमी झाल्या. मोटारसायकलवरील दोन युवकही जखमी झाले. चौघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात शनिवारी (२७ सप्टेंबर) सकाळी सव्वा आठला बीड बायपासवरील उमा गार्डनसमोर घडला.

सोपानराव जिजाराव देशमुख (वय ६४, रा. दर्शन विहार कॉलनी बीड बायपास, सातारा परिसर रिलायन्स डिजिटलमागे) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. शनिवारी (२७ सप्टेंबर) सकाळी आठला त्यांची मुलगी सायली सोपानराव देशमुख (वय २५) स्कुटीने (MH 20 FC 9566) हॅप इंटरनॅशनल स्कूल, चिकलठाणा येथे ड्युटीला जाण्यासाठी घरून निघाली. तिने देवळाई चौकातून तिची मैत्रिण रसिका किरण कडतू (वय २२, रा. देवळाई रोड श्रीसाईनगर लालमाती सातार परिसर) हिला सोबत घेतले.

दोघी हॅप इंटरनॅशनल स्कूलकडे बीड बायपासने जात असताना सकाळी सव्वा आठच्या सुमारास उमा गार्डनसमोर मागून सुसाट मोटारसायकलीने (MH-20 HG 2848) त्यांना जोरात धडक दिली. यात दोघीही रस्‍त्‍यावर पडून जखमी झाल्या. स्कुटीचे नुकसान झाले. धडक देणारा मोटारसायकलस्वार व त्‍याच्यामागे बसलेला युवकही जखमी झाला. चौघा जखमींना मागून येणाऱ्या अण्णा वाघ यांनी त्यांच्या कारमध्ये बसवून लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सायलीच्या डोक्याला, गुडघ्याला, दोन्ही हाताच्या कोपऱ्याला, दोन्ही पायाला मार लागला आहे. रसिकाच्या डोक्याला, चेहऱ्याला, दोन्ही हातांना, दोन्ही पायांना मार लागला आहे.

तिच्या उजव्या पायाच्या पंजावर शस्त्रक्रिया करावी लागली. दोघींवर लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. मोटरसायकल चालकाचे नाव अश्वजीत आप्पासाहेब गायकवाड (रा. वाणी मंगल कार्यालयाजवळ शिवाजीनगर) असल्याचे सायलीच्या वडिलांना कळले. त्यामुळे त्यांनी अभिजीतविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून नक्की कुणाची होती, याचा तपास सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सुभाष पवार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज

Latest News

हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
जयपूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ताप, अस्वस्थता जाणवू लागल्याने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना १० मार्चला जयपूर येथील सवाई मानसिंह...
१७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील घटना
शाळेच्या आवारात १३ वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे!; पैठणमधील प्रकाराने खळबळ
सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software