दोन गटांत तुंबळ हाणामारीने भीमनगरात तणाव, चिकनचे पाणी दुकानासमोर टाकल्यावरून वाद उफाळला, १२ जणांविरुद्ध गुन्हा, दोघांची प्रकृती गंभीर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  चिकनचे पाणी दुकानासमोर टाकल्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात दोन जण गंभीर जखमी, तर १० जण किरकोळ जखमी झाले. ही घटना बुधवारी (२६ नोव्‍हेंबर) सकाळी ११ च्या सुमारास भावसिंगपुऱ्यातील भीमनगरात घडली. छावणी पोलिसांनी दोन्ही गटांतील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भीमनगरात मनोज पाराजी लोखंडे (वय ४२, रा. समर्थनगर) यांचे बिल्डिंग मटेरियलचे श्री संतोष ट्रेडर्स नावाने दुकान असून, त्यांच्या दुकानाशेजारी बस्तेज टेस्टेज नावाने राहुल प्रकाश बस्ते (वय ३३, रा. अशोक दूध डेअरीजवळ, भीमनगर) यांचे चायनीज हॉटेल आहे. बुधवारी (२५ नोव्‍हेंबर) सायंकाळी सहाच्या सुमाराज बस्तेज टेस्टेज हॉटेलचा कामगार सादेक अली याने चिकन धुतलेले पाणी मनोज लोखंडे यांच्या दुकानासमोर फेकले. यावरून लोखंडे यांनी सुनावले. मनोज लोखंडे यांच्या तक्रारीनुसार, गुरुवारी सकाळी अकराला त्यांनी दुकान उघडले. दुकानावरील कामगार नितीन साठेही कामाला आला होता. सहकारी संपत प्रधान बाबा हेही दुकानावर सोबत होते. दुकानामागे माल उतरविण्याचे काम करत असताना बस्तेज टेस्टेज चायनीज हॉटेलचा मालक राहुल बस्ते व त्याचे मित्र आकाश दोंदे व इतर चार जण आले.

त्यांनी शिवीगाळ करत मनोज लोखंडे यांचा जीवे मारण्याच्या उद्देशाने गळा आवळला. आकाशने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने लोखंडे यांना मारून गंभीर जखमी केले. अनोळखी चौघांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. खिशातील रोख १० हजार रुपये आकाशने काढून घेतले. गल्लीतील लोकांनी हाणामारी थांबवली. त्यानंतर लोखंडी यांनी छावणी पोलीस ठाणे गाठून राहुल बस्ते व त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध तक्रार दिली. चायनीज सेंटरच्या नावाखाली रस्त्यावर अतिक्रमण करून अवैध दारू व्यवसाय करत असल्याचा आरोपही त्यांनी तक्रारीत लावला आहे. पोलिसांनी राहुलसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

राहुल बस्ते यांनी तक्रारीत म्हटले आहे, की ते दोन वर्षांपासून बस्तेज टेस्टेज चायनीज हॉटेल चालवतात. तुझ्या हॉटेलमधील चिकनचे पाणी आमच्या दुकानासमोर का टाकतो, असे म्हणत मनोज लोखंडे यांनी शिवीगाळ केली. खिशात हात घालून १५ हजार रुपये काढून घेतले. तू येथे धंदा कसा करतो, ते पाहून घेतो, पूर्ण खानदान संपवून टाकीन, अशी धमकी देत लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. लोखंडे यांनी बस्ते यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून जखमी केले, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून छावणी पोलिसांनी मनोज लोखंडे, संपत प्रधान बाबा यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर, पोलीस अंमलदार रामदास खाजेकर करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!

Latest News

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ! वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा...
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
कांचनवाडीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या युवकावर पोलिसांनी घातली झडप!, व्हॉट्‌स ॲप चॅटिंगमध्ये झाला धक्कादायक उलगडा...
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software