इनोवा कारच्या डिक्कीत ४ म्हशी कोंबलेल्या पाहून पोलीस हैराण!; बसस्थानक ते चाऊस कॉलनीपर्यंत पाठशिवणीचा थरार... 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर गुन्हे शाखेच्या पथकाने इनोवा कारचा पाठलाग करून ४ म्हशी वाचवल्या आहेत. कारच्या डिक्कीत म्हशी अत्यंत निर्दयीपणे कोंबलेल्या होत्या. ही कारवाई आज, ७ जानेवारीला पहाटे पाचच्या सुमारास चाऊस कॉलनीत करण्यात आली.

सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, पोलीस अंमलदार मनोज अकोले, मंगेश शिंदे, प्रदीप दंडवते हे गस्तीवर असताना आज पहाटे चारच्या सुमारास बाबा पेट्रोलपंपाजवळ आले. त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की इनोवा कारमध्ये (क्र. एमएच ०४ डीबी ६४४३) ४ म्हशी निर्दयीपणे कोंबून बाबा पेट्रोलपंप चौकाकडून मिलकॉर्नरकडे घेऊन जाणार आहेत. पोलिसांनी लगेचच मध्यवर्ती बसस्थानकासमोर पहाटे साडेचारला सापळा रचला. पावणेपाचच्या सुमारास कार्तिकी हॉटेल चौकाकडून मिलकॉर्नरकडे भरधाव संशयित इनोवा येताना दिसली. पोलिसांनी कारला थांबण्याचा इशारा केला असता त्याने न थांबता मिलकॉर्नरचे दिशेने पळून गेला.

पोलिसांनी लगेचच कारचा पाठलाग सुरू केला. कार जुब्लीपार्क, चांदणीचौक मार्गे कलेक्टर ऑफिससमोर असलेल्या चाऊस कॉलनी मशिदीच्या दिशेने गल्लीत गेली. पोलीसही पाठलाग करून त्या ठिकाणी आले. तिथे कार सोडून चालक पळून गेला होता. पहाटे पाचला पोलिसांनी कार जप्त केली. त्यात मागील डिक्कीत चार म्हशी दाटीवाटीने कोंबून  त्यांच्या तोंडाला बांधलेले व अर्धवट शुद्धीवर असलेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्या महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडे उपचारासाठी सोपविण्यात आल्या. इनोवा कारचालकाविरुद्ध पोलीस अंमलदार प्रदीप दंडवते यांच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार जगन्नाथ जेढर करत आहेत.

कारमधून गोवंश मांसाची वाहतूक
होंडा सिटी कारमधून गोवंशाच्या मांसाची वाहतूक करणाऱ्याला सिटी चौक पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मंगळवारी (६ जानेवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास पकडले. कार आणि दीडशे किलो गोवंश मांस असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुढीलाईन येथील शिया मशिदीजवळ करण्यात आली. कारचालक सोहेल शेख पिता सलीम शेख (वय २०, रा. जामा मशिदीजवळ ब्राह्मणगाव, आडूळ रोड छत्रपती संभाजीनगर) याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड, सहायक फौजदार  पठाण, पोलीस अंमलदार त्रिभुवन, पंडीत यांनी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software