- News
- सिटी क्राईम
- बदनाम ‘मुन्नी’ने भेदली प्रोझोन मॉलची सुरक्षा!
बदनाम ‘मुन्नी’ने भेदली प्रोझोन मॉलची सुरक्षा!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : प्रोझोन मॉलमध्ये बुरखाधारी महिलांनी पल्मोनाज स्टोअरमधून सोन्याचे २ ब्रासलेट लांबवले होते. ही चोरी शेख मुन्नी उर्फ शेख परवीन अब्दुल रहीम (वय ३५) हिने तिच्या मैत्रिणीसह मिळून केली आहे. सिडको एमआयडीसी पोलिसांनी मुन्नी आणि तिचा सावत्र मुलगा आमेर हुसैन खान (वय २५, दोघे रा. संजयनगर, बायजीपुरा) यांना अटक केली आहे. प्रोझोन मॉलमध्ये चोरीची घटना समोर असल्याने मॉलमध्ये व्यवसाय करणारे व्यावसायिकांत खळबळ उडाली होती. काही दिवसांच्या फरकाने दोन चोऱ्या समोर आल्याने एकूणच प्रोझोनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
शेख मुन्नी ही कुख्यात गुन्हेगार आहे. दागिन्यांच्या दालनात जाऊन चोरी करण्याचे अनेक कारनामे तिने केले आहेत. यापूर्वीही देखील तिच्याविरुद्ध ६ गुन्हे दाखल आहेत. सीसीटीव्ही फूटेजमुळे ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली. काही महिन्यांपूर्वी अजमेरमधील एका गुन्ह्यात राजस्थान पोलिसांनीही तिला अटक केली होती. परळीतही तिने गुन्हे केले आहेत. २०१९ मध्ये जिन्सी भागात एका हत्याकांडप्रकरणी तिचा पती हर्सूल कारागृहात असून, सध्या ती सावत्र मुलासोबत राहते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
18 Jan 2026 12:47:22
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...

