दुचाकी खड्ड्यात आदळून अपघात, कंपनी कामगाराचा मृत्यू, वाळूज एमआयडीसीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीत कंपनी कामगाराचा रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळून  झालेल्या अपघातात मृत्यू झाला. तो कंपनीत कामाला निघाला होता. जोगेश्वर-रामराई रस्त्याच्या बाजूला शेतात तो मृतावस्थेत आढळला. ही घटना आज, १५ जानेवारीला सकाळी घडली.

आकाश विठ्ठल वाघमारे (रा. जोगेश्वरी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तो मोटारसायकलीने (क्र. एमएच २० ईक्यू २४८६) कंपनीत कामाला जात होता. जोगेश्वरी-रामराई रस्‍त्‍यावरील नरवडे यांच्या शेताजवळ मृतावस्थेत आढळला. त्याला त्याचा भाऊ प्रदीप वाघमारे व अजिंक्य वाघमारे यांनी रिक्षातून घाटी रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वाळूज पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शेख गफ्फार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software