- News
- सिटी क्राईम
- अबब... छत्रपती संभाजीनगरकरांचे गळे कापण्यासाठी नायलॉन मांजाचे ६७२ गट्टू!, नसलेल्या ‘प्रदीप पाटील’च्य...
अबब... छत्रपती संभाजीनगरकरांचे गळे कापण्यासाठी नायलॉन मांजाचे ६७२ गट्टू!, नसलेल्या ‘प्रदीप पाटील’च्या नावाने छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा मागवत होता समीर अहमद!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये मकरसंक्रांतीच्या पवित्र सणाला गालबोट लावण्याचे मोठेच कारस्थान शहर पोलिसांनी उधळून लावले आहे. शहरवासियांचे गळे कापण्यासाठी सुरतहून चक्क नायलॉन मांजाचे ६७२ गट्टू मागवले होते. १ नोव्हेंबरला हे गट्टू कुरिअरद्वारे शहरात आले, मात्र ऑर्डर न स्वीकारली नाही. मुकुंदवाडीतील कुरिअर कंपनीने पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी ते तपासले असता १२ बॉक्समध्ये नायलॉन मांजाचे गट्टू आढळले. विशेष म्हणजे, प्रदीप पाटीलच्या नावाने पार्सल होते, जो अस्तित्वातच नव्हता. पार्सलवरील मोबाइल नंबरच्या आधारे पोलिसांनी खरे क्रूरकर्मा शोधले.
नायलॉन मांजामुळे दुर्घटना वाढल्याने शहर पोलिसांनी नायलॉन मांजाविरुद्ध व्यापक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या ३ दिवसांत ६ कारवाया केल्या. त्यातून ८ लाख ४ हजार ६५० रुपयांचे एकूण ९३३ गट्टू जप्त केले.
हे निघाले मौत के सौदागर...
मांजा विकणारे...
१. कफीलउल्ला खान फजलउल्ला खान (वय २८, रा. गल्ली नं. १२, शरीफ कॉलनी)
२. शेख मुशीर शेख अहमद अश्फाक अहमद (वय १९, गल्ली नं. १९, रा. शरीफ कॉलनी)
३. शेख फरदीन अब्दुल रज्जाक (वय २२, रा. शहाबाजार, हिदायत अली हाऊसशेजारी)
४. तालेब खान शेर खान (वय २५, रा. फातेमानगर, हर्सूल मुस्लिम कब्रस्तानजवळ)
५. मुदस्सिर ऊर्फ मुजीब अहमद नजीर अहमद (वय ४५, रा. आजम कॉलनी, रोशन गेट)
६. शेख फिरोज हबीब शेख (वय ४२, रा. निझामगंज कॉलनी, गल्ली नं. १० संजयनगर)
७. रिझवाना बेगम निसार शेख (वय ४५, रा. निझामगंज कॉलनी, गल्ली नं. १० संजयनगर)
८. इस्माइल शेख उर्फ आदिल हाजी शेख (वय ३२, रा. सातारा गाव)
पार्सल मागवणारे...
९. शेख फईम शेख नईम (वय ३३, रा. बाबर कॉलनी, कटकट गेट)
१०. समीर अहमद नजीर अहमद (वय ४३, रा. रोशन गेट)
क्रूरकर्म्यांची शहरातून काढली धिंड
शहर पोलिसांनी मांजा विकणाऱ्या शेख फरदीन अब्दुल रजक, तालेब खान शेरखान, मुदशीर ऊर्फ मुजीब अहमद नजीर अहमद यांची राजाबाजार भागातून धिंड काढली. राजाबाजार भागात शेठ बनून फिरणारे हे क्रूरकर्मा मृत्यूचे व्यापारी म्हणून मिरविण्यात आले.
मकरसंक्रांतीचे पावित्र्य धोक्यात आणण्याचा कट ?
मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे वैज्ञानिक, धार्मिक आणि सामाजिक कारणे आहेत. कुटुंबासोबत आनंद साजरा करणे आणि एकतेची भावना वाढवणे यांचा समावेश आहे. ज्यामुळे हा सण ‘पतंगोत्सव' म्हणूनही ओळखला जातो. मात्र या सणाला गालबोट लावण्याचे कारस्थान पकडलेल्या १० क्रूरकर्म्यांनी केले.

