रोडरोमिओचा कहर, बसथांब्यावर आधी विद्यार्थिनीची छेड काढली, नंतर शाळेत जाऊन घातला गोंधळ, वाळूज परिसरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टवाळखोराने कहरच केला. चक्क १५ वर्षीय विद्यार्थिनीची आधी बसथांब्यावर छेड काढली. नंतर शाळेत घुसून गोंधळ घातला. मुख्याध्यापकांनी त्याला आवरले असता, त्यांनाच शिवीगाळ करत मारहाण केली. ही धक्कादायक घटना वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत आज, २४ डिसेंबरला दुपारी १ च्या सुमारास घडली.

विलास अशोक चिडे (रा. गुरुधानोरा, ता. गंगापूर) असे टवाळखोराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध वाळूज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, ती दहावीत शिकते. सकाळी ९ ला शाळेत जाते, दुपारी ४ ला घरी परतते. आज सकाळी ९ ला ती शाळेत जाण्यासाठी बसथांब्यावर येऊन बसची वाट पाहत असताना विलास तिथे आला. तिला म्हणाला, अय पिल्लू चलती क्या... त्यामुळे मुलीने त्याला तू येथून जा, माझ्या वाटेला जाऊ नकोस. त्यानंतर तो तिथून निघून गेला. शाळेच्या बसने मुलगी शाळेत आली.

दुपारी १ ला मुलगी वर्गात असताना विलास परत तिथे आला. त्याने मुलीचे नाव घेऊन ती कुठे आहे, असे विचारत गोंधळ घालायला सुरुवात केली. त्याच्या आरडाओरड्याने मुख्याध्यापक धावून आले. त्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने मुख्याध्यापकांनाही मारहाण केली आणि निघून गेला. त्यानंतर मुख्याध्यापकांनी मुलीच्या आत्या व वडिलांना कॉल करून बोलावून घेतले. मुलीने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीला घेऊन तिच्या वडिलांनी वाळूज पोलीस ठाणे गाठले. बसस्थानकापासून शाळेपर्यंत लैंगिक उद्देशाने त्याने पाठलाग केल्याचे मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास वाळूज पोलीस करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आकाशवाणी चौक पुन्हा बंद!; ५४ दिवसांत पोलिसांचा यु टर्न..., वाढते अपघात, वाहतूक कोंडीचे दिले कारण

Latest News

आकाशवाणी चौक पुन्हा बंद!; ५४ दिवसांत पोलिसांचा यु टर्न..., वाढते अपघात, वाहतूक कोंडीचे दिले कारण आकाशवाणी चौक पुन्हा बंद!; ५४ दिवसांत पोलिसांचा यु टर्न..., वाढते अपघात, वाहतूक कोंडीचे दिले कारण
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीत राजकीय दबावाखाली येऊन आकाशवाणी चौक सुरू केल्यानंतर आता, ५४ दिवसांनी पुन्हा तो...
इंदिरानगरात घबराटीचे वातावरण : रात्री घरांवर तुफान दगडफेक, वाहने फोडली, ८ जण ताब्यात, दंगा काबू पथक तैनात
इंडिगो हाल करणार!; सायंकाळी नवी मुंबईचा हेलपाटा पडणार..., छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांमध्ये संतप्त पडसाद, नक्की काय बदल केलेत जाणून घेऊ...
मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software