‘मेट्रोपोलिस पोस्ट'चा दणका : धोकादायक रासायनिक उत्पादन करणाऱ्या एडी फार्माकेम कंपनीला युनिट बंद करण्याचे आदेश; प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धोकादायक रासायनिकांचे उत्पादन करून परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करणे अखेर वाळूज एमआयडीसीमधील एडी फार्माकेम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भोवले आहे. मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राने यासंदर्भात प्रकाशित केलेल्या बातमीची  दखल घेत अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) या कंपनीच्या व्यवस्थापनाला सदर युनिट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 'एमपीसीबी'ने उचललेले हे पाऊल परिसरातील पर्यावरणीय सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.

प्राप्त माहितीनुसार, सदर कंपनी धोकादायक रसायनांचे उत्पादन घेत होती. याबाबत परिसरातील इतर उद्योजकांनी ‘एमपीसीबी'कडे वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीत दाखल होत, वस्तुस्थितीची पाहणी केली. यावेळी या पाहणीत अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या. तपासणीदरम्यान कंपनीकडून पाणी (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा, १९७४ आणि हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा, १९८१ मधील नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले.
कंपनीच्या उत्पादन विभागातील वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यरत नसल्याचे, धोकादायक केमिकलचा अवैज्ञानिक साठा असल्याचे आणि सुरक्षित निस्तारण प्रक्रियेचा अभाव असल्याचेही यावेळी अधिकाऱ्यांना निरीक्षणात आढळले होते. अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणाहून काही केमिकलचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले होते.

दरम्यान, या तपासणीनंतर काही दिवसांतच म्हणजे ६ ऑक्टोबर रोजी कंपनीत नाट्यमयरित्या भीषण आग लागली. ही आग प्रथम प्रयोगशाळा विभागात लागून काही क्षणांतच संपूर्ण प्लांटमध्ये पसरली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती पसरली होती. या घटनेनंतर ‘मेट्रोपोलिस पोस्ट'ने कंपनीतील भोंगळ कारभार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्याकडे होणारे दुर्लक्ष यावर थेट प्रकाश टाकणारी आणि करडा प्रहार करणारी सविस्तर व ठोस बातमी प्रसिद्ध केली होती. या गंभीर वृत्ताची ‘एमपीसीबी'ला दखल घ्यावी लागली. अखेर मंडळाने तत्काळ बैठक घेत कंपनीला ७ ऑक्टोबर ‘क्लोजर डायरेक्शन’अशी नोटीस बजावली.

मंडळाने नोटिशीद्वारे कंपनीला तातडीने युनिट बंद करण्याचे सुनावले आहे. कंपनीने तत्काळ उत्पादन थांबवून सदरील युनिट बंद करावे, असे या नोटीशीत म्हटले आहे. एवढेच नव्हे तर 'एमपीसीबी'ने या नोटीशीची प्रत महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता / अतिरिक्त अभियंता तसेच वाळूज एमआयडीसीच्या पानी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पण पाठवली आहे. या दोन्ही विभागांना सदरील कंपनीचा अनुक्रमे वीज व पाणी पुरवठा बंद करण्यास सांगण्यात आले आहे. शिवाय या संदर्भातील अनुपालन अहवाल तातडीने सादर करण्यासही मंडळाने बजावले आहे.

इतर प्रदूषणकारी युनिट्सवरही व्हावी कठोर कारवाई
एडी फार्माकेम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर 'एमपीसीबी'ने केलेली ही कारवाई वाळूज औद्योगिक क्षेत्रातील पर्यावरणीय नियमांच्या अंमलबजावणीसाठी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे. परिसरातील उद्योजकांनी या निर्णयाचे स्वागत करतानाच इतर प्रदूषणकारी युनिट्सवरही अशाच कठोर कारवाया करण्याची मागणी केली जात आहे. सोबतच पर्यावरणाच्या रक्षणाच्या उद्देशाने प्रकाशित केलेल्या बातमीबद्दल ‘मेट्रोपोलिस पोस्ट'चे कौतुक करताना धन्यवादही दिले आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software