फटाका सायलेन्सर बुलेटला पण कारवाईचा आवाज शहरभर!, ७७ बुलेटस्वारांना पोलिसांनी शिकवला धडा, १७ बुलेट केल्या जप्त

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : फटाक्यासारखा आवाज करून धावणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध शहर पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी (३ ऑक्‍टोबर) एकाच दिवशी अशा तब्बल ७७ बुलेटस्वारांना धडा शिकविण्यात आला. त्‍यांच्याकडून ७७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तर १७ बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत.

वाहनात नियमबाह्य बदल करून फटाक्यासारखा आवाज करणारे सायलेन्सर बसविण्याकडे टवाळखोरांचा कल असतो. गर्दीच्या ठिकाणावरून, कॉलेज-हॉस्पिटल परिसरातून हे टवाळखोर जाणूनबुजून जोरजोरात आवाज करत बुलेट दामटतात. वाढत्या तक्रारींमुळे शहर पोलिसांनी अशा बुलेटस्वारांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशाने शहर वाहतूक शाखेच्या पाचही विभागांनी दुपारी आणि संध्याकाळी कारवाईसत्र राबवले. बुलेटस्वारांवर कारवाई करताना त्यांच्याकडे थकलेला ९७ हजार रुपयांचा दंडही पोलिसांनी वसूल केला.

सहायक पोलीस आयुक्‍त सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक अमोल देवकर, राजेश यादव, सहायक पोलीस निरीक्षक सचिन मिरधे, सुनील कराळे, दीपक ढोणे यांच्या पथकांनी कारवाई केली. यापुढेही सातत्याने विशेष मोहीम अशा बुलेटस्वारांवर कारवाई केली जाणार आहे. वाहनधारकांनी वाहनाची आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावीत. वाहनात अनधिकृत बदल करणे टाळावे. वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले आहे. मोठ्या आवाजाच्या सायलेन्सर असलेल्या बुलेट दिसल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावे, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software