आता रेल्वे तिकीट बुकिंगही छत्रपती संभाजीनगर नावाने!; ‘औरंगाबाद’चा बोर्ड उद्या उतरवून झळकणार ‘छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक’ 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : दक्षिण मध्य रेल्वे विभागाने शनिवारी (२५ ऑक्टोबर)  नोटिफिकेशन जारी करून छत्रपती संभाजीनगर शहराच्या रेल्वेस्टेशनचे नाव औरंगाबादवरून आता ‘छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन' असे केले आहे.

सन २०२२मध्ये आपल्या शहराचे नामकरण 'छत्रपती संभाजीनगर' असे करण्यात आले होते. या निर्णयानंतर तीन वर्षानी शनिवारी (दि. २५) दक्षिण मध्य रेल्वे विभागाने या नावावर शिक्कामोर्तब करीत औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केले. रेल्वे विभागाच्या कोडसाठी या स्टेशनचा ‘सीपीएसएन' असा वापर करण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून कळविण्यात आले आहे. यामुळे यापुढे तिकीट बुकिंगही छत्रपती संभाजीनगर या नावाने होईल. तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे सरकारने शहराचे नाव संभाजीनगर असे केले. नंतर आलेल्या शिंदे सरकारने नामविस्तार करून छत्रपती संभाजीनगर असे केले. केंद्र सरकारनेही या नावाला हिरवा कंदील दाखविला.

मात्र रेल्वे विभागाने औरंगाबाद रेल्वे स्टेशनच उल्लेख कायम ठेवला होता. रेल्वेस्थानकावर उद्या, २७ ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरचा बोर्ड लागणार आहे. रेल्वेच्या कार्मिक विभागाच्या विशेष प्रधान मुख्य कार्मिक व्यवस्थापक बी. सुनीथा यांनी यासंदर्भात २४ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ७ जुलै २०२५ रोजीच्या पत्राचा हवाला देण्यात आला आहे. मंत्रालयाच्या निर्देशानुसार हा बदल केला जाणार आहे.  अधिसूचनेनुसार आता सर्व अधिकृत नोंदी, तिकिटांवरील माहिती, फलक, वेळापत्रके आणि घोषणांमध्ये ‘छत्रपती संभाजीनगर' हे नाव वापरले जाणार आहे. पूर्वीचा कोड  एडब्ल्यूबी होता, आता नवीन कोड सीपीएसएन असेल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software