छत्रपती संभाजीनगरमधील तरुणाच्या खुनाचे २४ तासांत गूढ उकलले, मैत्रिणीच्या वादातूनच जीवलग मित्रानेच चिरला गळा!, मारेकऱ्याला अटक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जालना रोडवरील एसएफएस शाळेच्या मागील मैदानावर मंगळवारी (१४ ऑक्‍टोबर) रात्री ११.३० वाजता झालेल्या तरुणाच्या हत्येचे गूढ अवघ्या २४ तासांत पोलिसांनी उकलले आहे. मैत्रिणीच्या वादातून जीवलग मित्रानेच धारदार शस्‍त्राने त्याचा गळा चिरल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी मारेकऱ्याला बुधवारी (१५ ऑक्‍टोबर) अटक केली आहे.

सचिन उर्फ जंगली मच्छिंद्र जाधव (वय २४, रा. जुना बायजीपुरा) असे मारेकऱ्याचे नाव आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे चारला त्याला काली बावडी परिसरातून अटक केली. मृतक सुरेश भगवान उंबरकर (वय ३०, रा. कैलासनगर) आणि सचिन पूर्वी एकाच गल्लीत राहत होते. त्यातून दोघांत जीवलग मैत्री झाली होती. सुरेश हा जवाहर कॉलनी रोडवरील अंडाभुर्जीच्या गाडीवर काम करायचा. तिथेही सचिन नेहमी यायचा. मंगळवारी दिवसभर सचिन आणि सुरेश एकत्र होते. रात्री ते जालना रोडवरील एसएफएस शाळेमागील मैदानावर गेले. सध्या हे मैदान नशेखोरांचा अड्डा असते. दोघे तिथे गांजा पित बसले. याचदरम्यान दोघांत एका मुलीवरून वाद झाला.

वाद इतका वाढला की सचिन आणि सुरेशमध्ये हाणामारी सुरू झाली. सचिनने जवळील धारदार शस्‍त्राने सुरेशचा गळा चिरला आणि पळून गेला. हाणामारी सुरू असल्याचे कळताच तिथे बैठक मांडलेल्या दुसऱ्या नशेखोरांनी धाव घेतली, तोपर्यंत सचिन पळून गेला होता, तर सुरेश रक्‍ताच्या थारोळ्यात पडला होता. नशेखोरांनी जवाहरनगर पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन कुंभार, शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार, सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक तज्‍ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली.

हत्येनंतर सचिनला पळून जाताना काहींनी पाहिले होते, तर काहींनी त्याला ओळखलेही होते. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, पोलीस अंमलदार नवनाथ खांडेकर, संदीप तायडे, संजय गावंडे, सुनील जाधव, योगेश नवसारे, सोमकांत भालेराव, राजेश यदमळ यांनी काली बावडी परिसरात नशा करत बसलेल्या सचिनवर बुधवारी पहाटे चार वाजता झडप घातली. त्याच्या अंगावर ओरखडे दिसून आले. कसून चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. सचिनविरुद्ध यापूर्वीही अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. जानेवारीत त्याने एकावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर तो फरारी झाला होता.विशेष म्‍हणजे, जिन्सी, हेडगेवार रुग्णालय परिसरात राजरोस फिरत असूनही पोलिसांना त्याला पकडता आले नाही, हे विशेष. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!

Latest News

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ! वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा...
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
कांचनवाडीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या युवकावर पोलिसांनी घातली झडप!, व्हॉट्‌स ॲप चॅटिंगमध्ये झाला धक्कादायक उलगडा...
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software