- News
- सिटी क्राईम
- हरवले, चोरी गेले... जवाहरनगर पोलिसांनी जिद्दीने परत आणले पावणेसात लाखांचे मोबाइल!, २६ जणांच्या चेहऱ्...
हरवले, चोरी गेले... जवाहरनगर पोलिसांनी जिद्दीने परत आणले पावणेसात लाखांचे मोबाइल!, २६ जणांच्या चेहऱ्यावर आनंदीआनंद...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गेल्या ४ महिन्यांत मोबाइल चोरीला गेल्याच्या आणि हरवल्याच्या तब्बल २६ तक्रारींचा तपास पूर्ण करून हे मोबाइल शोधून परत आणण्यात जवाहरनगर पोलिसांना यश आले आहे. काही मोबाइल तर चक्क परराज्यातून पोलिसांनी जप्त करून आणले. ज्यांचे होते त्यांना हे मोबाइल आज, ४ डिसेंबरला सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांच्या हस्ते परत करण्यात आले. त्यावेळी मोबाइल परत मिळाल्याचा सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा झाला होता.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की मोबाइल हरवला किंवा चोरी गेल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार दाखल करावी. जेणेकरून शोधकार्य अधिक प्रभावीपणे करता येईल.
-सचिन कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जवाहरनगर पोलीस ठाणे
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Mar 2026 23:10:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा...

