कल्पना, डिम्पीला अशरफ समजत होता IAS, त्यांच्या मदतीने भावाला आणायचे होते भारतात!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) आणि डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई (वय ३०, रा. पालम, दिल्ली) हे आयएएस अधिकारी असल्याचा विश्वास बसल्याने त्यांच्या मदतीने पाकिस्तानमधील भावाला भारतात आणता येईल, असे अफगाणी मोहम्मद अशरफ गिल (वय २४, ह. मु. जंगपुरा, नवी दिल्ली) याला वाटले. त्यामुळेच त्याने कल्पनासोबत अतिजवळीक वाढवल्याचे तपासात समोर येत आहे. कल्पना त्याला प्रेम समजून बसली आणि त्याच्यासोबत अनेक मुक्काम ठोकले. ती पोलिसांच्या हाती लागेपर्यंत तो तिला आणि डिम्पीला आयएएस अधिकारीच समजत होता.

अफगाणिस्तामध्ये २०१७ साली तालिबानी हल्ले होत असताना २६ लाखांहून अधिक अफगाण नागरिक विविध देशांमध्ये शरणार्थी म्हणून गेले. अनेक जण भारतातही आले. ते दिल्ली, नोएडा, हैदराबादमध्ये स्थायिक झाले. अशरफला ३ भाऊ, १ बहीण आहे. २०१७ मध्ये अशरफचे कुटुंब विस्थापित झाल्यावर त्याची आई, दोन भाऊ पाकिस्तानमध्ये गेले. अशरफ भारतात आला, तर एका भावाची अफगाणिस्तानमध्येच हत्या झाली होती. काही काळानंतर त्याची आई व एक भाऊ पाकिस्तानमधून अफगाणिस्तानला परतले. एक भाऊ गिलानी पाकिस्तानमध्येच थांबला. अशरफची बहीण फिनलँडमध्ये आहे. अशरफच्या मोबाइलचा फॉरेन्सिक विभागाकडून तपास सुरू आहे. अशरफ दिल्लीत जंगपुरा भागात १२ हजार रुपये किरायाने ३ खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहतो.

अल्पशिक्षित असलेला अशरफ देशभरातील प्रदर्शनात सुका मेव्याचा स्टॉल लावतो. २०२४ मध्ये शहरातील एसएफएस मैदानावरील प्रदर्शनातही त्याने स्टॉल लावला होता. तिथेच त्याची कल्पनाशी भेट झाली. त्यावेळी कल्पनाने त्याला आपण आयएएस असल्याचे सांगितले होते. धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचन सोहळ्यात कल्पना आणि डिम्पीची ओळख झाली होती. कल्पनामुळे अशरफची ओळख डिम्पीसोबत झाली. हे दोघे आपल्याला भावाला पाकिस्तानमधून भारतात आणण्यास मदत करतील, असे अशरफला वाटत होते. त्यामुळेच त्याने कल्पनासोबत संबंध वाढवल्याचे समोर येत आहे. कल्पनाला सुरुवातीपासून आयएएस व्हायचे होते. तिने अनेक स्पर्धा परीक्षाही दिल्या. यूपीएससीची पूर्वपरीक्षाही उत्तीर्ण झाली होती. तिच्या आईचा मुलगी आयएएस असल्यावर अजूनही विश्वास आहे. २०१०-११ दरम्यान कल्पना यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीत राहिली होती. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी सिडकोत राहणाऱ्या तिच्या भावाने कल्पना अधिकारी झाल्याचे सांगत पेढेही वाटले होते, असे स्थानिक नागरिक सांगतात.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आकाशवाणी चौक पुन्हा बंद!; ५४ दिवसांत पोलिसांचा यु टर्न..., वाढते अपघात, वाहतूक कोंडीचे दिले कारण

Latest News

आकाशवाणी चौक पुन्हा बंद!; ५४ दिवसांत पोलिसांचा यु टर्न..., वाढते अपघात, वाहतूक कोंडीचे दिले कारण आकाशवाणी चौक पुन्हा बंद!; ५४ दिवसांत पोलिसांचा यु टर्न..., वाढते अपघात, वाहतूक कोंडीचे दिले कारण
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीत राजकीय दबावाखाली येऊन आकाशवाणी चौक सुरू केल्यानंतर आता, ५४ दिवसांनी पुन्हा तो...
इंदिरानगरात घबराटीचे वातावरण : रात्री घरांवर तुफान दगडफेक, वाहने फोडली, ८ जण ताब्यात, दंगा काबू पथक तैनात
इंडिगो हाल करणार!; सायंकाळी नवी मुंबईचा हेलपाटा पडणार..., छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांमध्ये संतप्त पडसाद, नक्की काय बदल केलेत जाणून घेऊ...
मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software