- News
- सिटी क्राईम
- नुकतीच १८ वर्षे पूर्ण केली अन् हर्सूल कारागृहात पोहोचला आमेर!, अल्लडपणातील रागामुळे नशिबी आले भोग!!...
नुकतीच १८ वर्षे पूर्ण केली अन् हर्सूल कारागृहात पोहोचला आमेर!, अल्लडपणातील रागामुळे नशिबी आले भोग!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नुकतीच वयाची १८ वर्षे पूर्ण केली आणि आमेर खान मेहराज खान (रा. इंदिरानगर) याच्या नशिबी हर्सूल कारागृहात जाण्याची वेळ आली आहे. याला कारण ठरला तो त्याचा अल्लडपणाचा राग... त्याने ११ वर्षांच्या मुलाला मोपेडवर बसवून दीड तास फिरवत मारहाण केली. त्याच्या गळ्यातील चांदीची साखळी हिसकावून घेतली होती...
सोमवारी (२ डिसेंबर) दुपारी इंदिरानगरमध्ये ११ वर्षांचा मुलगा सायकल खेळत होता. त्याच्या सायकलचा कट आमेरच्या मोपेडला लागला. त्यामुळे संतापलेल्या आमेर आणि त्याच्या अल्पवयीन मित्राने त्या मुलाला मारहाण करत मोपेडवर बसवले आणि दीड तास फिरवत, पुन्हा पुन्हा मारहाण करत त्याच्या गळ्यातील चांदीची साखळी हिसकावून घेतली. त्यानंतर दुपारी ४ ला शहानूरमियॉ दर्गा चौकात सोडून दिले. तिथे घाबरलेल्या मुलाने एका भाजीपाला विक्रेत्याला आपल्या आईला कॉल लावून देण्याची विनंती केली. भाजीविक्रेत्याने मुलाला आधार देत त्याच्या आई व मामाला कॉल लावून दिला. त्यांनी तातडीने येऊन मुलाला घरी नेले. त्यानंतर मुलाने जे सांगितले, ते ऐकून संतापलेल्या त्याच्या आईने त्याला घेऊन जवाहरनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.
अपहरणाचा प्रकार सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाला होता. शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी ही घटना गांभीर्याने घेत पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे, अभिजीत चिखलीकर, पोलीस अंमलदार कैलास काकड, संदीप तायडे, विजय निकम, बाळू नागरे यांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फूटेजमध्ये आमेरला ओळखण्यात आले. त्याला पोलिसांनी लगेचच घरातून अटक केली. त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही पकडले. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
Latest News
03 Mar 2026 10:53:01
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील परिसरातील ४ घटनांनी सध्या सारेच हादरले आहेत. यातल्या ३ घटना तर रांजणगाव...

