- News
- सिटी क्राईम
- आयसीयूमधून महिलेच्या मृतदेहावरील अडीच लाखांचे दागिने चोरीला!, छत्रपती संभाजीनगरच्या जे. जे. प्लस हॉस...
आयसीयूमधून महिलेच्या मृतदेहावरील अडीच लाखांचे दागिने चोरीला!, छत्रपती संभाजीनगरच्या जे. जे. प्लस हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील सेशन कोर्टासमोरील डॉ. जीवन राजपूत यांच्या जे. जे. प्लस हॉस्पिटलच्या आयसीयूमधून रुग्ण महिलेच्या अंगावरून अडीच लाखांचे दागिने चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी गुन्हा दाखल करून दागिन्यांचा शोध सुरू केला आहे. महिलेच्या मुलांनी हॉस्पिटलच्या स्टाफवर संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, धूत हॉस्पिटलच्या आयसीयूतूनही रुग्णाची ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी चोरीला गेल्याचा गुन्हा २६ नोव्हेंबरला सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर आता जे. जे. प्लस हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आल्याने नामांकीत समजल्या जाणाऱ्या हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या चोऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे.
तक्रारीनुसार, आयसीयू वॉर्डमध्ये असणारे डॉ. दिनेश पांडव व डॉ. शैलेश खरे यांनी संदीप व किरण यांना बिजलाबाई यांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळीत असलेले अंदाजे एखाद्या ग्रॅमचे गौतम बुद्धांचे पेंडल दिले व सांगितले, की तुमच्या आईचे उपचार करत असताना त्यांच्या अंगावरील दागिने बघितले होते. त्यानंतर जे. जे. प्लस हॉस्पिटलचे सीईओ डॉ. प्रशांत पाटील यांनी संदीप व किरण यांना सांगितले, की तुमच्या आईचे सोने १०० टक्के सात दिवसांच्या आत परत करतो. मात्र अद्यापपर्यंत त्यांनी आईचे चोरीला गेलेले दागिने परत केले नाही. त्यामुळे जे. जे. प्लस हॉस्पिटलमधील हाउस किपींग स्टाफ, नर्सिंग स्टाफ अन्य स्टाफवर संशय व्यक्त करत त्यांच्यापैकीच कुणीतरी दागिने चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार संतोष मुदिराज करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Mar 2026 18:43:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आवश्यक आहे. त्यात सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा...

