रस्त्यात मटके, लिंबू-कुंकू अन्‌ बरंच काही... ओलांडून गेले तर मृत्यू होईल!; बजाजनगरमध्ये हे काय भलतेच...सारेच घाबरले ना...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगरमध्ये आज, ४ जानेवारीला सकाळी एकच खळबळ उडाली. बजाजनगर–वडगाव (कोल्हाटी) रोडवरील एका खासगी शाळेसमोर भररस्त्यात पूजा केलेले मडके, रांगोळी, अगरबत्ती, लिंबू, मीठ व कुंकू ठेवून जादूटोणा करण्यात आल्याचे दिसले. मटक्यावर लिहिले होते, ओलांडून गेला तर मृत्यू होईल, मागे वळून पाहिल्यास जीव जाईल... ते सारं पाहून नागरिक घाबरून गेले.

WhatsAppImage2026-01-04at7.43.24PM1

विशेष म्हणजे, काही काळ परिसरात ये-जा थांबली होती. शाळेसमोरच असा प्रकार करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक व स्थानिक नागरिकांत घबराट पसरली होती. नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांच्या उपस्थितीत विज्ञाननिष्ठ मंडळींनी हा जादूटोणा हटवला. खासगी शाळेचे व्यवस्थापक नामदेव बनकर यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार कोणाला तरी लक्ष्य करून, भीती निर्माण करण्यासाठी केल्याचा संशय निर्माण करणारा असल्याने पोलीस तपास करत आहेत.

WhatsAppImage2026-01-04at7.43.24PM

परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून खोडकराचा शोध पोलीस घेणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते हनुमान भोंडवे, रोहित खैरे, अशोक लगड, पंडित नवले, किशोर उमाळे, विशाल खंडागळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकाराला खतपाणी न घालता असे प्रकार करताना कोणी आढळल्यास पोलिसांना कळवा. अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software