तू घरातून जाते की तुझे अश्लील फोटो व्हायरल करू, पतीने धमकावताच २६ वर्षीय विवाहिता हादरली!; पुंडलिकनगर पोलिसांत सांगितली आपबिती, संसार वाचविण्यासाठी तिने जे सहन केलं, ते ऐकून कुणाचाही संताप अनावर होईल...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : तू जाड आहेस, तू मला आवडत नाहीस, तू माझ्या लायकीची नाही, आपले कधीच पटू शकत नाही, तू घरातून निघून जा, अन्यथा तुझे अश्लील फोटो व्हायरल करून तुझी बदनामी करेल, असे पतीने धमकावले तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली... लग्न झाल्यापासून अन्याय-अत्‍याचार सहन करूनही संसार वाचविण्यासाठी ती सतत धडपडत होती. सासरचे तिला माहेरी नेऊन सोडायचे. दोन-तीन दिवस झाले की ती पुन्हा सासरी यायची... त्यामुळे संतापलेल्या पतीने तिला धमकी देताना नात्यालाच काळीमा फासला. गारखेडा परिसरातील नवनाथनगरातील २६ वर्षीय विवाहितेने पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. पोलिसांनी तिच्या पतीसह सासू, सासरे, दीर, जाऊ, नणंद अशा ६ जणांविरुद्ध बुधवारी (८ ऑक्‍टोबर) गुन्हा दाखल केला आहे.

कोमल (नाव बदलले आहे) सध्या आई-वडिलांकडे नवनाथनगरात राहते. तिचे लग्न १५ मे २०२३ रोजी परभणीच्या जिंतूर तालुक्‍यातील करंजी येथील युवकासोबत झाले होते. लग्नात तिच्या वडिलांनी २५ लाख रुपये खर्च केला. तिच्या सासरी सासू, सासरे, दीर, जाऊ, नणंद असे कुटुंब होते. लग्नानंतर एक महिना तिला चांगली वागणूक देण्यात आली. लग्नानंतर १४ जुलै २०२३ रोजी दुपारी तिचा पती तिला म्हणाला, की कर्जाचे पैसे फेडण्यासाठी १० लाख रुपये तुझ्या वडिलांकडून घेऊन ये. कोमलने पैसे आणण्यास नकार दिला असता पतीने तिला मारहाण केली. तिला बसस्थानकावर आणून सोडले. तिथून ती माहेरी आली. लग्नाला दोनच महिने झालेले असल्याने तिने माहेरी ही घटना सांगितली नाही. दोन-तीन दिवसांनी परत सासरी गेली. सासरी गेल्यानंतर सासू नणंदेने तिला तुझ्या वडिलांकडून पैसे आणले का, असे विचारले. कोमलने नकार दिला असता दोघींनी तिला अपमानास्पद बोलायला सुरुवात केली. तुझ्यापेक्षा सुंदर मुलगी आम्हाला मिळाली असती. तू दिसायला सुंदर नाही. तुझ्या बापाने पण काही दिले नाही, असे म्हणत त्यांनी मानसिक छळ सुरू केला. १६ ऑगस्ट २०२३ रोजी धोंड्याचा महिना असल्याने ती पतीसोबत माहेरी आली होती. धोंड्यामध्ये तिच्या आईने तिला सोन्याचे कानातले गिफ्ट म्हणून दिले. सासरी परतल्यावर तिच्या पतीने तिला जाब विचारला, की पहिला धोंडा होता. तुझ्या वडिलांनी मला सोन्याची साखळी का बनविली नाही?

सासरे, दीर यांनीही शिवीगाळ केली. दिराने यावेळी कोमलच्या तोंडात चापट मारली. उलट उत्तर देऊ नको म्हणून पतीनेही मारहाण केली. सासरच्यांनी तिचे लग्नातील सोन्याचे दागिने मोडले. त्यानंतरही तुझ्या बापाकडून पैसे घेऊन ये, नाहीतर आमच्या घरात राहू नको, असे म्हणून जाऊ, सासू, नणंदेने तिला २०२३ मध्ये दिवाळीच्या दिवशीच मारहाण केली. खूप जास्त प्रमाणात त्रास झाल्याने कोमलने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. तू माझ्या लायकीची नाही. आपले कधीच पटू शकत नाही, असे म्हणून पती तिच्यापासून दूर राहायचा. सासरच्यांनी तिला माहेरी नेऊन सोडले. त्यानंतर कोमल स्वतःहून पुन्हा सासरी गेली असता सासू, सासऱ्याने तिला मारहाण केली. नवऱ्याने धमकावले, की घरातून निघून जा. नाहीतर तुझे अश्लील फोटो वायरल करेल व तुझी बदनामी करेल. नंतर घरातून हाकलून दिले. अधिक तपास पोलीस अंमलदार संतोष केवारे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा... छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
विकास जैन यांनी ACP देशमुख यांचा गळा पकडून मागे ढकलले, बाकीच्यांनी हल्ला केला, म्हणून पोलिसांनी लाठीमार केला!; जैन, राजपूत, जीवनवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, शासकीय अभियांत्रिकी महावि‌द्यालयाच्या मतमोजणी केंद्रावरील दुसरी बाजू आली समोर 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software