- News
- सिटी क्राईम
- केंब्रीज चौकात भीषण अपघात : गॅस टँकरच्या चाकाखाली येऊन पत्नीचा मृत्यू, पती जखमी, टँकर-हायवामध्ये रंग...
केंब्रीज चौकात भीषण अपघात : गॅस टँकरच्या चाकाखाली येऊन पत्नीचा मृत्यू, पती जखमी, टँकर-हायवामध्ये रंगली होती पुढे जाण्याची स्पर्धा, दुचाकीला दिली धडक
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : भरधाव गॅस टँकर आणि हायवा यांच्यात पुढे जाण्याची जणू स्पर्धा लागली. दोन्ही वाहनांनी दुचाकीला हूल देत धडक दिली. टँकरच्या मागच्या चाकाखाली दुचाकी आली. यात दुचाकीवरील पत्नीचा चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (२५ ऑक्टोबर) दुपारी चार वाजता छत्रपती संभाजीनगर शहराजवळील केंब्रिज चौकात घडला.
सावंगी बायपासवरून अवजड वाहने सुसाट धावतात. यामुळे दुचाकीस्वारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी गस्त कायम ठेवावी. वेग मापक यंत्र बसवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. हा बायपास शहराजवळून जात असल्याने अनेक वस्त्या, गावांतील नागरिकांची वर्दळ शहरात जाण्यासाठी असते. ठिकठिकाणी बायपास ओलांडण्यासाठी चौक आहेत. मात्र ते लक्षात येत नाहीत. त्यामुळे तिथूनही अवजड वाहने सुसाट धावत असतात. त्यामुळे रस्ता ओलांडतानाही जीव मुठीत घेऊनच ओलांडावा लागतो. याकडे वाहतूक विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Mar 2026 23:10:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा...

