- News
- सिटी क्राईम
- फोटो हाती देत पोलीस म्हणाले, अपघातात मृत्यू झालेले हे तुमचेच पती का?, पत्नीने फोटो पाहिला अन् हंबरड...
फोटो हाती देत पोलीस म्हणाले, अपघातात मृत्यू झालेले हे तुमचेच पती का?, पत्नीने फोटो पाहिला अन् हंबरडा फोडला!; पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात काय घडलं...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : २९ नोव्हेंबरला कामानिमित्त घराबाहेर पडलेले ३५ वर्षीय सखाराम विठ्ठलराव चांदणे (रा. नुरी मशिदीजवळ, इंदिरानगर) नंतर घरी परतलेच नाहीत. बराच शोध घेतल्यानंतर त्यांच्या पत्नीने जवाहरनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली... बुधवारी (२४ डिसेंबर) पोलिसांनी अचानक कॉल करून त्यांना पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात जायला सांगितले. तिथे गेल्यानंतर पोलिसांनी एक फोटो हाती दिला आणि सांगितलं, अपघाती मृत्यू झालाय, हे तुमचेच पती का?, तो फोटो पाहून पत्नीने एकच हंबरडा फोडला...
नक्की काय घडलं?
२९ नोव्हेंबरला सकाळी ९:३० वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेने सखाराम गंभीर जखमी झाले होते. २ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजता त्यांचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र त्यांची ओळखच पटत नव्हती. पोलिसांनी शोध घेऊन अखेर २२ डिसेंबरला पंचशील महिला बचत गटाच्या मदतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. घरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर सखाराम यांचा अपघाती मृत्यू होऊनही ओळख न पटू शकल्याने कुटुंबीयांना अंत्यविधीचे सोपस्कारही पार पाडता आले नाहीत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
By City News Desk
Latest News
18 Mar 2026 15:36:48
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शिंदे गटाच्या प्रयत्नांना सुरूंग लावत, 'जादूची कांडी' फिरवून भारतीय जनता पक्षाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा...

