धक्कादायक : घाटीत रुग्णांच्या नातेवाइकांना लुटणारी तरुणांची टोळी सक्रीय!, एका रुग्णाच्या नातेवाइकाने हिंमत दाखवून एकाला पकडले, तिघे पळाले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : २०-२१ वर्षांची तरुण मुले चक्क लुटमारीत गुंतल्याचे समोर आले. ते लुटतही अशांना होते, की त्यातून त्याची विकृती समोर आली. ते चक्क घाटी रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाइकांना लुटायचे. विरोध केला की मारहाण करायचे. एका रुग्णाच्या नातेवाइकाने धाडसाने प्रतिकार करत त्यातील एका पकडून ठेवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. ही धक्कादायक घटना गुरुवारी (२० नोव्‍हेंबर) सायंकाळी ७ ला घडली. पोलिसांनी नंतर अन्य तीन लुटारूंनाही पकडून अटक केली आहे.

दौलत प्रभत जंगले (वय ३८, रा. कानेगाव पो. बाबरा ता. फुलंब्री) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते पत्नी नंदा, मुली यशश्री आणि धनश्री यांच्यासह राहतात. ते झाल्टा फाटा येथील खासगी कंपनीत चालक आहेत. त्यांची पत्नी गरोदर असल्याने व पोटात दुखत असल्याने ते पत्नीला घेऊन बुधवारी दुपारी घाटी रुग्णालयात आले होते. प्रसुती होणार असल्याचे सांगून डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करून घेतले. गुरुवारी पहाटे त्यांची प्रसुती झाली. गुरुवारी सायंकाळी ७ ला नातेवाइक घाटी रुग्णालयात जेवणाचा डबा घेऊन येणार असल्याने दौलत त्यांची वाट पाहत पार्किंगमध्ये थांबलेले होते.

त्यावेळी चार अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी दौलत यांना पकडून चाकूचा धाक दाखवून हातात घातलेली चांदीची साखळी (किंमत १२ हजार रुपये) हिसकावून घेतली. त्यांच्या खिशातील दीड हजार रुपये काढून घेतले. दौलत यांनी विरोध केली असता मारहाण केली. त्याही परिस्थितीत दौलत यांनी हार न मानता प्रतिकार सुरू केला. त्यातील एकाला पकडून ठेवले. आरडाओरड झाल्याने तिघे पळून गेले. दौलत यांनी एकाला पकडून ठेवले होते. दौलत हे पकडलेल्या व्यक्तीला घेऊन घाटी पोलीस चौकीत गेले. काही वेळीने तिथे पोलिसांची गाडी आली.

त्यांनी दौलत व त्या चोरट्याला घेऊन बेगमपुरा पोलीस ठाण्यात नेले. तिथे दौलत यांनी चारही लुटारूंविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी पकडण्यात आलेल्या तरुणाकडे कसून चौकशी केली असता त्याने स्वतःचे नाव यश विनोद सूर्यवंशी (वय २०, रा. ब्राह्मणगल्ली बेगमपुरा) असे सांगितले. त्याच्या सोबतच्या लुटारूंची नावेही त्याने सांगितली. आकाश बबन रामफळे (वय २१, रा. घाटी क्वार्टर), बलराम दीपक जाधव (वय २१, रा. घाटी क्‍वार्टर), प्रेम राजेंद्र सिसोदे (वय १९, रा. ब्राह्मण गल्ली बेगमपुरा) अशी त्यांची नावे समोर आली. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करत पळून गेलेल्या तिघांनाही अटक केली आहे.

अशाप्रकारे अनेकांना लुटल्याचा संशय
ज्‍या पद्धतीने दौलत जंगले यांना लुटण्यात आले, तसे अनेक रुग्णांच्या नातेवाइकांनी या चौकडीने लुटल्याची शक्यता आहे. पोलीस तिघांच्या मागावर आहेत. लुटारूंचे वय पाहतासुद्धा आजच्या तरुणाईची वाटचाल अशा वाममार्गाकडे सुरू असल्याने चिंता व्यक्त होत आहे. विशेष म्‍हणजे घाटीत एमएसएफ जवान हे वाहने आणि इतर सुरक्षेसाठी तैनात आहेत. तरीही ही घटना घडली. त्यामुळे हे जवान नक्की काय करतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

२२ वर्षीय तरुणीला प्रेमासाठी जबरदस्ती, लग्न मोडण्याची धमकी!, फुलंब्री तालुक्यातील घटना

Latest News

२२ वर्षीय तरुणीला प्रेमासाठी जबरदस्ती, लग्न मोडण्याची धमकी!, फुलंब्री तालुक्यातील घटना २२ वर्षीय तरुणीला प्रेमासाठी जबरदस्ती, लग्न मोडण्याची धमकी!, फुलंब्री तालुक्यातील घटना
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सताळा पिंपरी (ता. फुलंब्री) येथील एका २२ वर्षीय तरुणीला वारंवार कॉल करून प्रेमासाठी जबरदस्ती करणाऱ्या...
प्रा. राजाराम लोंढे हत्या प्रकरण : अंगठ्या, मोबाइल जप्त करण्यात यश येईना, करण आडेच्या पोलीस कोठडीत २२ मार्चपर्यंत वाढ
शहर पाणी योजनेत दखलपात्र प्रगती : धरणातून जॅकवेलमध्ये पाणी आणण्यात यश, जी. श्रीकांत यांनी पिले दोन घोट, मानले गोदामाईचे आभार!
अंबादास दानवेंवर सौदेबाजीचा आरोप, जि. प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत सदस्यांचा केला १८ कोटींना सौदा, ४ कोटी स्वतः हडपले... ‘या’ सदस्याच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ
औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software