- News
- सिटी क्राईम
- घरावर ईडीचा छापा मारू, गोळीबार करू... महिलेला ६ दिवस डिजिटल अरेस्टमध्ये ठेवले, २५ लाख रुपये उकळले!,
घरावर ईडीचा छापा मारू, गोळीबार करू... महिलेला ६ दिवस डिजिटल अरेस्टमध्ये ठेवले, २५ लाख रुपये उकळले!, छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर भामट्यांनी तब्बल सहा दिवस गृहिणीला डिजिटल अरेस्टमध्ये ठेवत २५ लाख ८७ हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यातील आरोपींच्या जबाबात तुमचे नाव समोर आले आहे. तुम्हाला अटक करणार असून, तुमच्या घरावर ईडीचा छापा पडणार आहे. घरावर गोळीबार करण्यात येईल... अशा धमक्या भामट्यांनी दिल्या होत्या. पत्नीच्या वागण्यातील बदल पाहून पतीने विश्वासात घेत विचारणा केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. दाम्पत्याने बुधवारी (२५ डिसेंबर) पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
By City News Desk
Latest News
20 Mar 2026 10:46:16
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सताळा पिंपरी (ता. फुलंब्री) येथील एका २२ वर्षीय तरुणीला वारंवार कॉल करून प्रेमासाठी जबरदस्ती करणाऱ्या...

