द्वारकानगरातील तरुणाचा मृतदेह हर्सूल तलावात आढळल्याने खळबळ!, आत्‍महत्‍या की घातपात?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको भागातील द्वारकानगरातील २१ वर्षीय तरुण ९ डिसेंबरला घरातून बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह हर्सूल तलावात शुक्रवारी (१२ डिसेंबर) आढळल्याने खळबळ उडाली आहे. महेश भारत निकम असे या तरुणाचे नाव आहे. तो हरवल्याची तक्रार त्याच्या घरच्यांनी सिडको पोलिसांत केली होती.

अग्निशमन दल व हर्सूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. हर्सूल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. महेश पदवीचे शिक्षण घेत होता. तो कोणाला काहीही न सांगता घरातून बाहेर पडला होता. रात्रीही परत न आल्याने त्याचा शोध कुटुंबीयांनी सुरू केला. मात्र तो सापडला नव्हता. त्याच्या कुटुंबात आई, वडील व एक भाऊ असा परिवार आहे. त्याने आत्‍महत्‍या केली, घातपात आहे, याबद्दल चर्चा सुरू आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software