- Marathi News
- सिटी डायरी
- Special Story : छ. संभाजीनगर शहरात गणेश विसर्जनासाठी पोलीस, महापालिका सज्ज!; ३००० पोलिसांचा बंदोबस्...
Special Story : छ. संभाजीनगर शहरात गणेश विसर्जनासाठी पोलीस, महापालिका सज्ज!; ३००० पोलिसांचा बंदोबस्त, अनेक मार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद, २१ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था
On
.jpg)
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गणेशोत्सवाची सांगता शनिवारी (६ सप्टेंबर) होईल. बाप्पाला उत्साहाने निरोप देण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. गणेश विसर्जनासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. विसर्जन मिरवणुकांमुळे अनेक चौक, मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. मूर्ती विसर्जनासाठी ठिकठिकाणी महापालिकेने कृत्रिम तलाव तयार केले आहेत. यंदा गणेशोत्सवात डीजेवर बंदीचे आवाहन करण्यात आले होते, मात्र आगमनावेळी अनेकांनी डीजे वाजवला होता. आता विसर्जन मिरवणुकीत काय होते, हे पहावे लागेल.
छत्रपती संभाजीनगर शहरात गणेश विसर्जन शांततेत व्हावे यासाठी ४ पोलीस उपायुक्तांसह ७ सहायक पोलीस आयुक्त, ३९ पोलीस निरीक्षक, १५० सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, २४५० पुरुष अंमलदार, ३५० महिला अंमलदार, ५०० होमगार्ड तैनात असतील. त्यांच्या मदतीला रॅपिड ॲक्शन फोर्सच्या २ कंपन्या, २ दंगा काबू पथक, ३ बॉम्बशोधक नाशक पथके, १२ स्ट्रायकिंग फोर्स असतील. २१ ठिकाणे संवेदनशील घोषित केली असून, तिथे २१ अधिकारी व ८४ हजार तैनात असतील. १६ ड्रोन्सद्वारे आकाशातून नजर ठेवली जाणार आहे. पैठण गेट, शहागंज, सिटी चौक, बाराभाई ताजिया, राजाबाजार येथे वॉच टॉवर्स असतील. गेल्यावर्षी ५ कटू घटनांमुळे पोलीस आयुक्तांनी यंदा सर्व पोलीस ठाणे, गुन्हे शाखेसह विशेष शाखेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. संवेदनशील परिसरात गस्त घालण्यात येणार आहे.
-मुख्य मिरवणुकीचा मार्ग संस्थान गणपती ते सिटीचौक, गुलमंडी, बाराभाई ताजिया ते जिल्हा परिषद मैदान.
-संस्थान गणपती ते शहागंज चमन, गांधीपुतळा, सिटीचौक, जुनाबाजार मार्ग भडकलगेट.
-जिन्सी चौक ते संस्थान गणपती, जाफरगेट, मोंढा ते राजाबाजार.
-निजामोद्दीन दर्गा रोड ते शहागंज चमन.
-भुरे पहेलवान यांचे घर ते निजामोद्दीन चौक व उजवीकडे शहागंज चमनपर्यंत.
-चेलीपुरा चौक ते गांधी पुतळा, मंजूरपुरा चौक ते गांधीपुतळा.
-लोटाकारंजा ते सराफा, रोहिला गल्ली.
-बुढीलेन, जुने तहसील कार्यालय, बारुदनगरनाला.
-सिल्लेखाना चौक, पैठणगेट ते सिटीचौक.
सावरकर चौक ते बळवंत वाचनालय चौक.
अंजली टॉकीज, महात्मा फुले चौक ते काळे चौक.
-रॉक्सी कॉर्नर ते बाबूराव काळेचौक.
सिडकोतील हे मार्ग बंद
-चिश्तीया चौक ते बळीराम पाटील शाळा, ओंकार चौक ते सिडको पोलीस स्टेशन मार्ग-टी.व्ही. सेंटर चौक ते एन-१२ विसर्जन विहीर.
-चांदणे चौक, जिल्हाधिकारी कार्यालय टी.व्ही. सेंटर रस्ता.
-सिडको एन १ चौक ते सेंट्रल नाका तसेच चिश्तिया चौक.
-सेव्हनहिल ते शिवाजीनगर, त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज मंदिर.
महापालिकेने शहरात एकूण २१ ठिकाणी मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली आहे. यात विहिरी, तलाव आणि कृत्रिम तलावांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तैनात असतील. सर्व ठिकाणी ५ फुटांपर्यंतच्या मूर्तीचे विसर्जन करण्याची सोय आहे. मूर्तीची उंची ५ फुटांपेक्षा जास्त असणाऱ्या मंडळांनी स्वतःच्या स्तरावर विसर्जनाची व्यवस्था करावी, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
गंगापूरजवळ दोन दुचाकींची जोरदार धडक, वृद्धाचा मृत्यू, ३ जखमी
By City News Desk
गणपती पाहून परतणाऱ्या व्यावसायिकावर चाकूहल्ला!; चिकलठाण्यातील घटना
By City News Desk
सुसाट कारने स्कुटीस्वार शिक्षिकेला उडवले, सेंट्रल नाका चौकातील घटना
By City News Desk
Tech News : फोन चार्जिंग करताना वापरत असाल तर सावधान!
By City News Desk
Latest News
07 Sep 2025 18:08:27
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सरकारी भिंत पाडल्यानंतर फोटो काढल्याने संतप्त चौघांनी सरपंच महिलेवर हल्ला चढवला. एकाने तोंडात चापट मारली....