सिटी चौक भागात दोन गटांत तुंबळ हाणामारी, ५ जण जखमी, दोन्ही गटांतील ४० जणांविरुद्ध गुन्हा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिटी चौक परिसरातील बीएमसी बँकेसमोर पतंग उडविण्यावरून बुधवारी (१४ जानेवारी) दुपारी ३ च्या सुमारास दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. ५ जण गंभीर जखमी झाले.  दोन्ही गटांनी सिटी चौक पोलीस परस्परविरोधी तक्रारी दिल्या. त्यावरून पोलिसांनी दोन्ही गटांतील एकूण ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शेख कदीर माहेमेनू शेख (वय २४, रा. आस्मीन कॉम्प्लेक्स बीएमसी बँकेसमोर, सिटीचौक) याने तक्रारीत म्हटले आहे, की तो आईसह राहतो. सोनार कारागीर म्हणून मजुरी करतो. बुधवारी (१४ जानेवारी) दुपारी तीनच्या सुमारास तो व त्याचा मित्र हर्ष कुरील हे घराच्या छतावर पतंग उडवत होते. तेथे त्यांच्या छतावर दानीश व त्याचे चार मित्र पतंग उडवायला आले. ते पाण्याच्या टाकीवर चढून पतंग उडवत होते. त्यावर शेख कदीरने म्हटले, की तुम्ही पाण्याच्या टाकीवर चढून पतंग उडवू नका. त्यावर दानीश व त्याच्या मित्रांनी शिवीगाळ करून कदीर व हर्षला हाताचापटाने मारहाण केली. सर्वजण घराच्या छतावरून रोडवर पळत आले. तेव्हा तेथे खूप लोक जमा झाले. त्यात कदीरचे मित्र जयेश संजय आहिर, सजन प्रेमचंद जांगडे, कुणाल कृष्णा लोखंडे हे भांडण सोडवण्यास आले.

दानीशचे काका मोहम्मद हानिफ मोहम्मद सि‌द्दीक (वय ४०), सय्यद जाहेद सय्यद जुबेर, मोहम्मद यासेर मोहम्म नाजेर, नजिबउल्ला खान यांनी शिवीगाळ करून त्यांच्या हातातील लाकडी दांड्याने जयेशच्या डोक्यावर मारून त्याला गंभीर जखमी केले. सजन जांगडे व कुणाल लोखंडे यांनासुद्धा लाकडी दांड्याने मारहाण केली. कदीरची आई नसीहा बेगम यांनाही शिवीगाळ केली. आरडाओरड वाढल्याने आणि लोक जमल्याने ते तेथून पळून गेले. त्यानंतर कदीर हा जयेश आहिर, चेतन जांगडे, सजन जांगडे, कुणाल लोखंडे यांच्यासह सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आला. दुसऱ्या गटाचेही लोक पोलीस ठाण्यात आलेले होते.

पोलीस ठाण्यातून घराकडे परतताना सिटी चौकातील बीएमसी बँकेसमोर पुन्हा सजन जांगडे व कुणाल लोखंडे यांना दानिशच्या गटातील २० ते २० जणांनी लाकडी दांडा व लोखंडी रॉडने मारहाण केली. पोलिसांनी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. कदीरच्या तक्रारीवरून दानीश व त्याचे चार मित्र (सर्व रा. बारुदगरनाला) आणि मोहम्मद हानिफ मोहम्मद सि‌द्दीक, सय्यद जाहेद सय्यद जुबेर, मोहम्मद यासेर मोहम्मद नाजेर, नजिबउल्ला खान (सर्व रा. काळी मशिदीजवळ, छत्रपती संभाजीनगर) व इतर २० ते २२ जण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष खरात करत आहेत.

दुसऱ्या गटाच्या तक्रारीत काय म्हटलंय?
मोहम्मद दानिश रफीक तबानी (वय २२, रा. काळी मशिदीजवळ, सिटीचौक) यानेही तक्रार दिली आहे. तो ओरीओन सिटीकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उस्मानपुरा येथे उपचार घेत आहेत. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याने सांगितले, की तो आई-वडिलांसह राहतो. बुरखा विक्रीची दुकान चालवतो. बुधवारी तीनच्या सुमारास तो व त्याचा भाऊ मोहम्मद सोहेल हे त्यांचे काका मोहम्मद वसीम राहत असलेल्या बीएमसी बँकेसमोरील गल्लीमधील जुनाबाजार येथील बिल्डींगच्या टेरेसवर पतंग उडवत होता. बिल्डींगमध्ये इतरही लोकांचे फ्लॅट असून सर्वांनी टेरेसवर वैयक्तीक पाण्याच्या टाक्या लावलेल्या आहेत. बिल्डींगमध्ये राहणारा कदीर टेरेसवर आला.

दानिशला बघून शिवीगाळ करत म्हणाला की, कल मेरे पाणी के टाकीपर कौन चढा था, असे म्हणून शिवीगाळ करू लागला. त्यावरून वाद झाला. त्यांचे भांडण लोकांनी सोडवले. दानिश व त्याचा भाऊ बिल्डींगच्या खाली हापशाजवळ आले असता तिथे कदीर हा त्यांच्या ७ ते ८ मित्रांसह तेथे आला. त्यांच्या हातात प्लास्टीक पाईप व लाकडी दांडे होते. त्यांनी दाशिनला हाताचापटाने मारहाण सुरू केली. गुडघ्यावर लाकडी दांड्याने जोरात मारल्याने तो जखमी झाला. काहींनी त्याच्या डोक्यात प्लास्टीक पाईपने मारले. त्यामुळे दानिशचे मित्र जैद, यासेर व त्याचे काका मोहम्मद हानिफ भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही त्या लोकांनी दांड्याने व प्लास्टीक पाईपने मारले. त्यामध्ये जैद व यासेर हे जखमी झालेले आहेत. या तक्रारीचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष खरात करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

‘घाटी’त बोगस नियुक्तपत्र घेऊन आला, पदोन्नतीच्या पदाचा सरळ सेवा भरती आदेश पाहून अधिकारी चक्रावले, बिंग फुटले!, छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

‘घाटी’त बोगस नियुक्तपत्र घेऊन आला, पदोन्नतीच्या पदाचा सरळ सेवा भरती आदेश पाहून अधिकारी चक्रावले, बिंग फुटले!, छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकाविरुद्ध गुन्हा दाखल ‘घाटी’त बोगस नियुक्तपत्र घेऊन आला, पदोन्नतीच्या पदाचा सरळ सेवा भरती आदेश पाहून अधिकारी चक्रावले, बिंग फुटले!, छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बनावट नियुक्ती आदेश घेऊन घाटी रुग्णालयात नोकरीसाठी आलेल्या युवकाविरुद्ध बेगमपुरा पोलिसांनी मंगळवारी (१७ मार्च)...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर फडकला भाजपचा झेंडा!; मध्यरात्रीतून मंत्री सावेंनी गणित जुळवले, भाजपचे गलांडे-जैस्वाल अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध झाले!!
कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन शाखेत ब्रँच मॅनेजरनेच केला घोटाळा!; वाळूज MIDC पोलिसांत गुन्हा दाखल
हिंदू नववर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात उद्या शोभायात्रा, खैरेंनी मंत्री शिरसाट, सावे, अंबादास दानवेंना केले ‘हे’ आवाहन...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software